September 26, 2023
PC News24
आमचे बोलणेआरोग्यकथाखेळाजिल्हाजीवनशैलीज्योतिषठळक बातम्यादेशधर्मनिवडणूकब्लॉकमनोरंजनराजकारणराज्यव्यक्तिमत्वव्यवसाय

थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून केलेल्या शेवटच्या भाषणात गिरीश बापट काय म्हणाले होते?

Girish bapat Last Speech : खासदार गिरीश बापट यांचं दु:खद निधन झालं आहे. पुण्याच्या विकासात त्यांचं महत्वाचं योगदान होतं. मागील 40 वर्ष त्यांनी पुण्याच्या विकासावर काम केलं. नगरसेवक ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. मात्र याच राजकीय प्रवासातील पुणे पोटनिवडणुकीच्या वेळी थरथरते हात आणि व्हिलचेअरवर बसून केलेलं भाषण त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं भाषण ठरलं. त्या भाषणावेळी आजारी असतानादेखील पक्षासाठी असलेली आत्मियता पाहून अनेकांना अश्रु अनावर झाले होते. पुण्यातील केसरी वाड्यात पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान केसरी वाड्यात भाजपचा मेळावा आयोजित केला होता. त्याच मेळाव्यातील भाषण शेवटचं भाषण ठरलं.

गिरीश बापटांनी व्हिलचेअरवर बसून भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी भाजपच्या  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही महत्वाच्या राजकारणासंदर्भात टीप्स दिल्या होत्या. ते म्हणाले होते की, निवडणुकीच्या प्रचारात मी सक्रिय नसलेली 1968 साला नंतर ही पहिलीच निवडणूक आहे. माझ्या प्रकृतीमुळे मी यंदा प्रचारात उतरु शकलो नाही. भाजपने अनेक निवडणुका लढल्या. कधी हरलो तर कधी जिंकलो. मात्र पक्षाची संघटना ही कायम मजबूत राहिली. कार्यकत्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी पूर्ण करावी. पक्षासाठी अधिक वेळ द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला होता.

दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. मुक्ता टिळकांची राजकारणाची सुरुवात गिरीश बापटांमुळेच झाली होती. त्यांनी मुक्ता टिळकांना राजकारणाचे धडे दिले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या प्रचारात मुक्ता टिळकांची आठवण काढत ते भावुक झाल्याचं बघायला मिळालं होतं. 

कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे. मी अनेक वर्ष या आत्म्याची सेवा करण्यासाठी दिले आहेत. नागरिकांपर्यंत अनेकांना पोहचा आणि भाजप पक्ष वाढवा. या पोटनिवडणुकीत निवडून आल्यावर मी पेढे वाटीन, असं ते म्हणाले होते. गिरीश बापट जेव्हा भाजपकडून निवडणूक लढवायचे तेव्हा भाजपचे नेते निश्चिंत असायचे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचा विश्वास होता. त्यामुळेच आजारी असतानादेखील ते प्रचारासाठी उतरले होते. 

आधी माघार घेतली पण नंतर थेट…

खासदार गिरीश बापट यांनी आजारपणाचं कारण देत प्रचारातून माघार घेतली होती. त्यांनी पत्र काढत यासंदर्भात माहिती दिली होती. कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 26 फेब्रुवारी 2023 रोजी जाहीर झाली. आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस करावा लागत होतं. त्यामुळे सध्या डॉक्टरांनी बाहेर न फिरण्याचा सल्ला दिला होता. आजारपणाच्या कारणास्तव सदर पोटनिवणुकीसाठी मी वैयक्तिकरित्या मतदारसंघात फिरुन प्रचार करु शकणार नाही, असं त्यांनी पत्राद्वारे सांगितलं होतं. मात्र त्यांनी केसरी वाड्यात व्हिलचेअरवरुन त्यांनी बैठकीला हजेरी लावली होती. 

Related posts

सुप्रिया आणि सदानंद सुळेंचे अदानीच्या कंपन्यात शेअर्स.

pcnews24

ब्रेकिंग न्यूज -मराठा आरक्षणासाठी युवकाने घेतले विष.

pcnews24

ईद साजरी करण्यासाठी वाहतुकीचे सुयोग्य नियोजन.

pcnews24

‘सरकार कोणाचे येईल हे सांगण्यासाठी लाल किल्ला नाही’: पंतप्रधान.

pcnews24

‘अजित पवार सत्तेतून बाहेर पडा’ बारामतीचा आवाज!!

pcnews24

खंडणीची धमकी देणाऱ्यास पोलिसांकडून अटक, आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे, मनसेचे नेते वसंत मोरे अशा राजकीय नेत्यांना केले होते टार्गेट.

pcnews24

Leave a Comment