September 26, 2023
PC News24
आमचे बोलणेआरोग्यकथाखेळाजिल्हाजीवनशैलीज्योतिषठळक बातम्यादेशधर्मनिवडणूकब्लॉकमनोरंजनराजकारणराज्यव्यक्तिमत्वव्यवसाय

Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेने गाठला 100 भागांचा टप्पा

Jui Gadkari On Tharla Tar Mag : ‘ठरलं तर मग’ (Tharla Tar Mag) या मालिकेने अप्लावधितच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता या लोकप्रिय मालिकेचे 100 भाग पूर्ण झाले आहेत. मालिकेतील कलाकारांनी केक कापून या यशाचा आनंद सादरा केला आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्री जुई गडकरीनेदेखील (Jui Gadkari) खास पोस्ट शेअर केली आहे. 

‘ठरलं तर मग’ मालिकेने 100 भागांचा टप्पा पार केल्यानंतर आपला आनंद व्यक्त करत जुई गडकरी म्हणाली,”मला सायली या भूमिकेसाठी विचारणा झाली तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही.  तो पहिला कॉल आज खूप आठवतोय. त्या एका कॉलने माझं आयुष्य बदललं. माझं हे कुटुंब 100 भागांचं  झालं आहे”. 


जुई गडकरी पुढे म्हणाली,”आज फक्त आणि फक्तं आभार मानते त्या सगळ्यांचे ज्यांनी विश्वास ठेऊन जुईला ‘सायली’ दिली. ही मालिका माझ्यासाठी खूप जास्त जवळची आहे. कारण एका मोठ्या आजारपणातून बाहेर पडताना या मालिकेने मला आपलसं केलं. मी आज एक वेगळं आयुष्य अनुभवतेय. या सेटवर आणि या मालिकेसाठी काम करणाऱ्या प्रत्येकामध्ये इतकी सकारात्मकता भरलेली आहे की मला परत मागे वळून बघायचच नाही. मी फक्त ऋणी आहे त्या सगळ्यांची ज्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही. मला नेहमी आत्मविश्वास दिला की मी करु शकेन. तुमचे आशिर्वाद आणि शुभेच्छा नेहमी पाठीशी असुदे”.

सायली आणि अर्जुनच्या नात्यातले बरेचसे पैलू मालिकेच्या यापुढील भागांमधून उलगडणार आहेत. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या मालिकेने बाजी मारली आहे. या आठवड्या टीआरपी रिपोर्टमध्ये ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.

जुई गडकरीचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक

‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या माध्यमातून जुई गडकरीने छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक केलं आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेनंतर जुई छोट्या पडद्यापासून दूर होती. तिची ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेमुळे जुई घराघरांत पोहोचली. पण एका गंभीर आजाराने त्रस्त असल्यामुळे ती अनेक दिवस मालिका विश्वापासून दूर होती. पण तिने छोट्या पडद्यावर चांगलच कमबॅक केलं आहे.

संबंधित बातम्या 

Marathi Serial : ‘ठरलं तर मग’ म्हणत जुई गडकरीने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी’; ‘आई कुठे काय करते’चं स्थान घसरलं

Related posts

देश:साखर, डाळी महागल्या तर खाद्यतेल उत्पादक संकटात.

pcnews24

देश: ..मात्र वाघ शिकारीला एकटाच जातो…स्मृती इराणी यांचा विरोधक ऐक्याला टोला

pcnews24

शनिवारी मराठा संघटनांकडून पिंपरी चिंचवड बंदचे आवाहन.

pcnews24

सावरकर जयंतीला व्याख्यान,शुक्ल यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे आयोजन

pcnews24

POCSO कायद्यांतर्गत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आंध्र प्रदेश हायकोर्टाने आज POCSO कायद्यांतर्गत ‘पेनिट्रेटिव्ह लैंगिक अत्याचार’ सिद्ध करण्याच्या उद्देशासाठी वीर्य आवश्यक नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

pcnews24

कोर्टाच्या आवारात सुनेस जिवंत जाळण्याचा प्रयत्न

pcnews24

Leave a Comment