May 30, 2023
PC News24
आमचे बोलणेआरोग्यकथाखेळाजिल्हाजीवनशैलीज्योतिषठळक बातम्यादेशधर्मनिवडणूकब्लॉकमनोरंजनराजकारणराज्यव्यक्तिमत्वव्यवसाय

शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद; ‘या’ स्टॉक्सने बाजार सावरला

Share Market Closing Bell:  आज भारतीय शेअर बाजारासाठीचा दिवस चांगला ठरला. बुधवारी, बाजार तेजीसह बंद झाला. बँकिंग, आयटी सेक्टरमधील स्टॉक्समध्ये खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे बाजार आज वधारला. आज दिवसभरातील शेअर बाजारातील व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 346 अंकांच्या तेजीसह  57,960 अंकांवर आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 129 अंकांच्या तेजीसह 17,080 अंकांवर स्थिरावला. 

आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू अशा सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून आली. फक्त ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील स्टॉकसमध्ये थोडीशी घसरण झाली आहे. निफ्टी 50 मधील फक्त 6 कंपन्यांचे शेअर दर घसरणीसह बंद झाले. तर, 44 कंपन्यांचे शेअर दर वधारले. सेन्सेक्स 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्यांचे शेअर दर तेजीसह बंद झाले. तर, फक्त 4 कंपन्यांचे शेअर दर घसरले. 




इंडेक्‍स 
किती अंकांवर स्थिरावला
दिवसभरातील उच्चांक
दिवसभरातील नीचांक
किती टक्के बदल


BSE Sensex
58,064.12
58,087.33
57,524.32
0.0078


BSE SmallCap
26,604.04
26,627.71
26,128.83
1.70%


India VIX
13.63
15.10
13.32
-9.75%


NIFTY Midcap 100
29,775.55
29,833.60
29,291.10
0.0154


NIFTY Smallcap 100
8,852.10
8,867.95
8,706.65
0.0173


NIfty smallcap 50
4,041.65
4,050.40
3,992.50
0.012


Nifty 100
16,918.05
16,962.70
16,791.30
0.0073


Nifty 200
8,875.60
8,896.55
8,806.85
0.84%


Nifty 50
17,080.70
17,126.15
16,940.60
0.76%

या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी-घसरण

आजच्या ट्रेडिंग सत्रात, एचसीएल टेकच्या शेअर दरात 2.72 टक्क्यांची तेजी दिसून आली. एचयूएल 1.98 टक्के, बजाज फिनसर्व्ह 1.93 टक्के, टाटा मोटर्स 1.85 टक्के, बजाज फायनान्स 1.70 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.68 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.67 टक्के, एसबीआय 1.62 टक्के, कोटक महिंद्रा 1.32 टक्के, टाटा स्टील 1.07 टक्क्यांनी वधारत बंद झाला. तर भारती एअरटेल 0.63 टक्क्यांनी, रिलायन्स 0.56 टक्क्यांनी, एशियन पेंट्स 0.53 टक्क्यांनी घसरले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ

आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत चांगली वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे मार्केट कॅप 254.77 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. मंगळवारी मार्केट कॅप 252 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले होते. आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.77 लाख कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.

तेजीसह बाजाराची सुरुवात 

शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीत (Nifty) तेजी पाहायला मिळाली. सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्सनं 57800 चा टप्पा ओलांडला. याशिवाय निफ्टीनंही बाजार उघडताच 17000 च्या वरची पातळी गाठली. आज, जवळपास सर्व सेक्टोरल इंडेक्समध्ये तेजी दिसून आली. 

मंगळवारी घसरण 

भारतीय शेअर बाजारात मंगळवारी विक्रीचा दबाव दिसून आला आहे. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे बाजारात घसरण दिसली. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात किंचीत घसरण झाली होती. तर, दुसरीकडे संपूर्ण बाजारात पडझड दिसून आली होती. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला होता.

Related posts

Nashik : शाळा आवारात विद्यार्थ्यांचं भांडण, शिक्षकाकडून विद्यार्थ्यास मारहाण, नाशिकमधील घटना

Admin

‘खासदारांना अशी वागणूक तर सर्वसामान्यांचे काय?’ सुप्रिया सुळे.

pcnews24

बनावट चावी द्वारे वाहनांची चोरी करणारे अट्टल चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

pcnews24

जांभूळवाडी तलावात हजारो माशांचा मृत्यू (व्हिडिओ सह)

pcnews24

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर, मुलींचा डंका

pcnews24

NVS-1 उपग्रह लाँच,काय महत्व आणि फायदे, नक्की वाचा.

pcnews24

Leave a Comment