December 11, 2023
PC News24
आमचे बोलणेआरोग्यकथाखेळाजिल्हाजीवनशैलीज्योतिषठळक बातम्यादेशधर्मनिवडणूकब्लॉकमनोरंजनराजकारणराज्यव्यक्तिमत्वव्यवसाय

छ. संभाजीनगर: महाविकास आघाडीच्या सभेच्या दिवशीच भाजपची ‘सावरकर सन्मान रॅली’

Chhatrapati Sambhaji Nagar News: राज्याच्या राजकारणात आता छत्रपती संभाजीनगरची (Chhatrapati Sambhaji Nagar) वेगळी ओळख निर्माण होत आहे. 2 एप्रिलला महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) पहिली ‘वज्रमूठ सभा’ छत्रपती संभाजीनगर शहरात होणार आहे. मात्र आता त्याच दिवशी भाजपकडून (BJP) छत्रपती संभाजीनगर शहरात ‘सावरकर सन्मान रॅली’ काढली जाणार आहे. भाजपचे आमदार तथा सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकार विरोधात महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ सभे’ नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची देखील ‘धनुष्यबाण यात्रा’ छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. 

सद्या राज्याच्या राजकारणात एका सभेला दुसऱ्या सभेने उत्तर देण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीच्या राज्यभरात होणाऱ्या वज्रमुठ सभेला देखील भाजप आणि शिंदे गटाकडून उत्तर देण्यात येणार आहे. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांची एकत्रित सभा राज्यभरात होणार आहे. याची सुरवात छत्रपती संभाजीनगरमधून 2 एप्रिलला होणार आहे. मात्र याच सभेच्या दिवशी भाजपकडून शहरातील वेगवेगळ्या तीन मतदारसंघात ‘सावरकर सन्मान रॅली’ काढली जाणार आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वा. सावकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून भाजप महाविकास आघाडीला यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे. 

आम्ही सावरकर, नाशिकमध्ये झळकले बॅनर 

राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावरून पुन्हा एकदा राज्यासह देशात स्वा. सावरकर (Veer Sawrakar) मुद्द्यावरून राजकारण तापलं आहे. अशात नाशिकमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेकडून लावण्यात आलेले  बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकच्या विवार कारंजा परिसरात स्वा. सावरकरांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांना लक्ष्य करणारे बॅनर लागले आहेत.  ज्यात ‘आम्ही सारे सावरकर’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. या बॅनरवर एका बाजूला काँग्रेस नेते मनी शंकर अय्यर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला बाळासाहेब ठाकरे जोड्याने मारत असल्याचे चित्र दाखविण्यात आले आहे. या चित्राखाली सावरकरांचा अपमान झाल्यानंतर बाळासाहेबांनी स्वतः रस्त्यावर उतरून निषेध केला होता, असा उल्लेख करण्यात आला आहे. 

एकनाथ शिंदेंची ‘धनुष्यबाण यात्रा’

महाविकास आघाडी 2 एप्रिलपासून राज्यभरात एकत्रित सभा घेणार आहे. तर याच सभांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरणार आहे. तर एकनाथ शिंदे देखील राज्यभरात ‘धनुष्यबाण यात्रा’ काढणार आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीची ज्या छत्रपती संभाजीनगर शहरातून सभांना सुरवात होणार आहे, त्याच छत्रपती संभाजीनगरमधून एकनाथ शिंदे यांच्या ‘धनुष्यबाण यात्रे’ला सुरवात होणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

स्वा. सावरकरांवरील टीकेनंतर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या टीझरमधून राहुल गांधींना वगळलं?

Related posts

महाराष्ट्र:NCP सुळे गटाच्या प्रचारप्रमुखपदी खासदार अमोल कोल्हे यांची नियुक्ती

pcnews24

विधानसभा निवडणुकीत भाजपला 125 जागासह सर्वात मोठा पक्ष : नवीन सर्व्हे

pcnews24

छत्रपती संभाजीनगर रात्री ११ नंतर बंद!!

pcnews24

आषाढ अमावस्या म्हणजेच दीप पूजनाचे जाणून घ्या महत्व.

pcnews24

भोसरी एमआयडीसी मध्ये विनापरवाना झाडे तोडली; कंपनी मालक व ठेकेदारावर गुन्हा.

pcnews24

महाराष्ट्र :मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा २०२३ मधे महापालिकेचा सहभाग.

pcnews24

Leave a Comment