June 9, 2023
PC News24
आमचे बोलणेआरोग्यकथाखेळाजिल्हाजीवनशैलीज्योतिषठळक बातम्यादेशधर्मनिवडणूकब्लॉकमनोरंजनराजकारणराज्यव्यक्तिमत्वव्यवसाय

Thane : ठाण्यातील काही भागात पाणी कपात!

Thane Water Cut : ठाण्याच्या पाणीपुरवठ्याबाबत (Thane Water Cut News) मोठी बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलबोगद्याला गळती निर्माण झाली असून या जलबोगद्याच्या दुरूस्तीचे काम 31 मार्च पासून हाती घेण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कारणास्तव बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 31 मार्च 2023 पासून पुढील 30 दिवस 15% पाणी कपात लागू राहणार आहे. परिणामी ठाणे महापालिका क्षेत्रात मुंबई महापालिकेच्यावतीने पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या परिसराला देखील पाणी कपात लागू राहणार आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी कपात पुढील परिसरांना लागू राहणार आहे. तरी पाणीकपात कालावधीत नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

31 मार्चपासून ठाण्यातील काही भागात 30 दिवस 15 टक्के पाणी कपात (१/९)


— Thane Municipal Corporation – ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) March 29, 2023

ठाण्यातील ‘या’ भागात पाणी कपात

गावदेवी जलकुंभावरुन पाणीपुरवठा होणारा परिसर 

नौपाडा, गोखले रोड, स्टेशन परिसर, बी केबीन, राम मारुती मार्ग उजवी बाजू, महागिरी, खारकर आळी, चेंदणी, खारटन रोड, मार्केट परिसर. 

टेकडी बंगला जलकुंभावरुन पाणीपुरवठा होणारा परिसर 

 टेकडी बंगला, वीर सावरकरपथ, संत गजानन महाराज मंदिर पर्यत, पाचपाखाडी, नामदेववाडी, भक्ती मंदिर रस्ता, सर्व्हिस रस्ता.

कोपरी कन्हैयानगर व धोबीघाट जलकुंभावरुन पाणीपुरवठा  होणारा परिसर 

कोपरी गाव, ठाणेकरवाडी, सिंधी कॉलनी, साईनाथनगर, साईनगर, कोळीवाडा, सिडको संपूर्ण कोपरी (पूर्व), आनंदनगर, गांधीनगर, कान्हेवाडी, केदारेश्वर, संपूर्ण ठाणे पूर्व परिसर. 

हाजुरी कनेक्शन मार्फत थेट पाणीपुरवठा

लुईसवाडी, काजुवाडी, हाजूरी गाव, रघुनाथनगर, जिजामाता नगर, साईनाथ नगर. 

किसननगर कनेक्शन मार्फत थेट पाणी पुरवठा 

किसननगर १, किसननगर २, किसननगर ३, शिवाजीनगर, पडवळनगर, डिसोझावाडी. 

अंबिकानगर कनेक्शनमार्फत थेट पाणीपुरवठा 

अंबिकानगर २, ज्ञानेश्वरनगर, जयभवानी नगर, राजीव गांधी नगर.

उन्हाळ्यातील पाणी वितरणाचा कृती आराखडा तात्काळ तयार करण्याचे आदेश

रात्री-अपरात्री पाणी सोडणे म्हणजे महिलांच्या स्वास्थ्याशी खेळण्यासारखे असल्याने त्यांच्या सोयीनुसार पाणी वितरणाची वेळ असावी आणि पाणी पुरवठ्याबद्दल कोणतीही तक्रार आली तर ती विनाविलंब दूर करण्यासाठी अभियंत्यांनी संवेदनशीलता दाखवावी, त्याचबरोबर उन्हाळ्यातील पाणी वितरणाचा कृती आराखडा तात्काळ तयार करण्याचे आदेशही आयुक्त बांगर यांनी बैठकीत दिले होते.

संबंधित बातम्या

Thane Water Cut: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! शुक्रवारी आणि शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार

Related posts

अश्लिल रॅप साँगप्रकरणी शुभम जाधव या रॅपरवर गुन्हा दाखल.

pcnews24

आजचे आपले राशीभविष्य !

pcnews24

‘३० मुलींनाचे अपहरण करून हत्या करणाऱ्या त्या’ आरोपीला जन्मठेपेची शिक्षा.

pcnews24

त्रिवेणीनगर येथील स्पाइन रोड चे रखडलेले काम होणार पूर्ण

pcnews24

ठाणे, मुंबई परिसरात वाढत्या मोटार सायकल चोरी प्रकरण उघड,त्रिकुटास मुंब्रा पोलीसांकडून अटक.

pcnews24

नवले ब्रीज ठरतोय Accident point.स्वामीनारायण मंदिर येथे भीषण अपघात

pcnews24

Leave a Comment