दिनांक २८,२९ व ३० मार्च २०२३ रोजी गोपाळ इंटरनॅशनल स्कूल,बंगलोर येथे आयोजित १७ व्या राष्ट्रीय ऐरोबिक जिम्नास्टीक स्पर्धांनचे आयोजन करण्यात आले होते.हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या ७ खेळाडूंनी भाग घेतला.या स्पर्धेत सृष्टी खोडके ने ११ वर्षातील वैयक्तिक महिला प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले.गेल्या वर्षी देखील सृष्टी ने याच गटात सुवर्ण पदक प्राप्त केले होते.अकादमीचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री. हर्षद कुलकर्णी यांनी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले तर प्रशिक्षक सौ. अलका तापकीर यांनी प्रबंधक म्हणून काम केले.
खेळाडूंनच्या उत्तम यशाच्या निम्मीताने पिंपरी चिंचवड जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. संजय मंगोडेकर, सचिव श्री. संजय शेलार, हेवन जिम्नॅस्टिक्स अकादमीचे प्रशिक्षक श्री. चैतन्य कुलकर्णी, अकादमीचे मार्गदर्शक मा.नगरसेवक श्री. विनोद तापकीर, मा. नविन तापकीर व हेवन जिम्नास्टीक अकादमीच्या पालकांनी खेळाडूंनचे खूप कौतुक केले.
अकादमीच्या खेळाडूंनचा निकाल पुढील प्रमाणे.
११ वर्षातील गट
प्रकार: वैयक्तिक महिला
सृष्टी खोडके -सुवर्ण पदक
प्रकार तिहेरी
अंतरा कळमकर,धानी पटेल,सानवी पाटील -चौथा क्रमांक
१७ वर्षातील गट
प्रकार तिहेरी
परीजा क्षीरसागर, वृंदा सुतार, अपेक्षा शेलार- सहावा क्रमांक पटकावला.