२०२३-२४ या आर्थिक वर्षांत नवीन जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच या विभागाच्या उत्पन्नात दरवर्षी वाढ होताना दिसून येत आहे.
२०२२-२३ या आर्थिक वर्षांत आकाशचिन्ह विभागाला १७ कोटी २४ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. शहराच्या सौदर्यांत बाधा न येता जाहिरात फलक उभारणे आणि उत्पन्न वाढीसाठी आकाशचिन्ह विभागाच्या वतीने चालू आर्थिक वर्षांत विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी नवीन जाहिरात फलक उभारण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
आकाशचिन्ह व परवाना विभागात उत्पन्न वाढीसाठी जुनी थकबाकी वसूल करण्यास प्राधान्य दिले.
सचिन ढोले उपायुक्त,आकाशचिन्ह व परवाना विभाग यांच्या म्हणण्यानुसार,
शहरातील जाहिरात फलकांचे सर्वेक्षण केले. काही जाहिरात फलकांची पालिकेकडे नोंद नव्हती. त्याची नोंद करून वसुली केली. आता नवीन जाहिरात फलक उभारण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे.