त्रिवेणीनगर येथील स्पाइन रोड बाधिताना भोसरी येथे भूखंड उपलब्ध करून दिल्यामुळे तेथील बाधितांचा प्रश्न सुटला आहे.
त्रिवेणीनगर बाधित घरांना महानगर पालिकेने गतवर्षी नवनगर विकास प्राधिकरण भोसरी येथे प्लॉट चे वाटप केले आहे त्यामुळे त्रिवेणीनगर रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या ३९ घरांवर गुरुवारी दि. ०६.०४.२३ रोजी १५ दिवस आधी नोटीस देवून कारवाई करण्यात आली.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काम पूर्ण झाल्यावर त्रिवेणी नगर येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.