वसंत ऋतुच्या चैतन्यमयी वातावरणात समरसता साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पहिल्यांदाच वसंत ऋतू संबंधीत कथा,कविता
अभिवाचन अशा एकत्रित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी,दि.९ एप्रिल २०२३,दुपारी ४.३० वा. पुनरुत्थान समरसता गुरुकुल,गावडे जलतरण तलावाशेजारी,चिंचवडगाव येथे हा कार्यक्रम होणार आहे.या वसंतोत्सवास सुप्रसिद्ध लेखिका,कवयित्री सुवर्णाताई जाधव प्रमुख पाहुण्या आहेत. निसर्ग अभ्यासक डॉ.अजित जगताप तसेच सामाजिक कार्यकर्त्या मीनाताई पोकरणा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.सृजनाचा हा चैतन्यमयी अनुभव घेण्यास रसिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन समरसता साहित्य परिषदेचे अध्यक्ष-कैलास भैरट,सचिव-सुहास घुमरे,कार्यवाह-मानसी चिटणीस यांनी केले आहे.