कोणत्याही कार्यक्रमाचे वृत्त कसे लिहावे, त्याचा आढावा कसा घ्यावा याबाबत संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती साहित्य विधेच्या वतीने कार्यक्रम वृत्त लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे.
ही कार्यशाळा दिनांक ०९/०४/२०२३ रोजी सकाळी ९.३० ते १२ या वेळेत आयोजित केली आहे.
मुक्त पत्रकार व माध्यम अभ्यासक,अखिल भारतीय संस्कार भारती केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ.नयना ताई कासखेडीकर या कार्यशाळेचे मार्गदर्शन करतील.
सदरची कार्यशाळा सर्वांसाठी मोफत असून पिंपरी चिंचवड मधील सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे संस्कार भारती पिंपरी चिंचवड समिती अध्यक्ष श्री सचिन काळभोर यांनी केले आहे
कार्यशाळा रघुमाउली उद्यान हॉल, बिजलीनगर, चिंचवड येथे होणार आहे.अधिक माहिती साठी सचिव लीना आढाव यांच्याशी संपर्क साधावा +919545051990.