June 1, 2023
PC News24
जीवनशैलीधर्म

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान १० जून रोजी

जगद्गुरु संतशिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून १० जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पालखी २८ जून रोजी पंढरीत दाखल होणार आहे. अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख भानुदास महाराज मोरे आणि देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी शनिवारी दिली.यंदा पालखी सोहळ्याचे ३३८ वे वर्ष आहे.

वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते, त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा झाली आहे. संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतीक्षा करत असतात. मागील वर्षी करोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर पारंपरीक पद्धतीने वारी सुरू करण्यात आली होती. प्रस्थान ठेवल्यानंतर इनामदार वाड्यात पालखी सोहळा पहिला मुक्काम करणार आहे. संत तुकारामांची पालखी २८ जून रोजी पंढरीत दाखल होणार असून २९ जून रोजी आषाढी एकादशीच्या सोहळ्यात पालखी सोहळ्यातील वारकरी सहभाग घेणार आहेत.

आषाढी पालखी सोहळ्याची घोषणा झाल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे.

Related posts

चिंता करू नका, ग्राहकांना भुर्दंड नाही; UPI पेमेंटशी निगडीत ‘या’ गोष्टी समजून घ्या

Admin

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाने साजरी,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन

pcnews24

आमचं घर आम्हाला परत करा; भाडेकरूच्या मुजोरीला कंटाळून पुण्यात ज्येष्ठ दाम्पत्याचं उपोषण

Admin

आजचे आपले राशीभविष्य!

pcnews24

शॉर्ट कपड्यावर बंदी आता पुण्यातील मंदिरांमध्ये सुद्धा

pcnews24

लखनऊ सुपर जायंट्सनचे पंजाबसमोर 258 धावांचे आव्हान.

pcnews24

Leave a Comment