उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगीजी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेजी यांच्या भेटीची माहिती शिंदे यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊटवर देण्यात आली आहे.
उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री श्री.योगी जी यांनी दिलेले स्नेहभोजनाचे निमंत्रण स्वीकारून आज त्यांच्या लखनऊ येथील शासकीय निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेतली.
अयोध्या दौऱ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
तसेच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याबाबत आमच्यात प्रामुख्याने चर्चा झाली