श्री गणेशाय नमः
बुधवार 12 एप्रिल 2023
शालिवाहन शके 1945
परीघ योग
विष्टि करण सायंकाळी 4.45 पर्यंत राहणार आहे त्यामुळे कोणतेही शुभ कार्य 5 पर्यंत ठरवू नये आज चंद्र धनु राशीत असणार आहे
नक्षत्र मूळ नक्षत्र दुपारी 12 वाजेपर्यंत राहील त्यानंतर पूर्वा षा ढा नक्षत्र असेल
चैत्र कृष्ण 7
रवी व गुरु मीन
बुध राहू मेष केतु तूळ
शुक्र वृषभ व मंगल मिथुन राशीत या सर्व ग्रहचा विचार करून आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष
तुम्हाला आज चंद्र मंगल शनिची उत्तम साथ लाभणार आहे यशस्वी व्हाल नोकरीच्या संधी मिळतील तरुणांचे विवाह
जमतील
शुभ रंग पांढरा
भाग्य 85%
वृषभ रास
शनी अनुकूल आहे चंद्र अनुकूल नाही मनाविरुद्ध
घटना घडतील बढतीचे योग आहेत घरातील वातावरण नाजूक राहील
शुभ रंग पिवळा
भाग्य 60%
मिथुन रास
चंद्र अनुकूल आहे मनाप्रमाणे घटना घडतील पण अपेक्षा जास्त असल्याने जोडीदाराशी मतभेद होतील राशीस्वामी बुध
राहू युक्त असल्यामुळे पित्ताचा त्रास होईल
शुभ रंग हिरवा
भाग्य 90%
कर्क रास
आज मामाकडून विशेष लाभ होईल आईची तब्येत उत्तम राहिल जोडीदाराशी मतभेद झाले तरी 5 नंतर मूड उत्तम राहील मुलांची विशेष काळजी घ्या
शुभ रंग निळा
भाग्य 58%
सिंह रास
राशीस्वामी रवी मीनेत असल्यामुळे अजून कामाची जबाबदारी वाढेल चंद्र अनुकूल असल्यामुळे मनासारख्या
घटना घडतील मुलांची उत्तम प्रगती राहील
शुभ रंग लाल
भाग्य 78%
कन्या रास
राशीस्वामी राहू पीडित आहे शनी मंगल अनुकूल आहेत नवीन वास्तूचे योग येतील गोड खाण्याचे योग आहेत प्रवास रद्द कराल
शुभ रंग पिवळा
भाग्य 72%
तूळ रास
छोटया प्रवासाचे योग शेजाऱ्यांशी चांगले संबंध राहतील कलेला वाव मिळेल हस्ताक्षर स्पर्धेत यश मिळेल
शुभ रंग हिरवा
भाग्य 70%
वृश्चिक रास
अचानक धनलाभाचे योग शुक्र अनुकूल आहे आज दिवस उत्तम जाईल काम कमी असेल
शुभ रंग निळा
भाग्य 79%
धनु रास
चंद्र अनुकूल आहे राशीस्वामी गुरूचे पाठबळ 22 एप्रिल 23 नंतर लाभेल सुंदर वास्तू लाभ होईल आजचा दिवस धावपळ राहील
शुभ रंग पिवळा
भाग्य 67%
मकर रास
आजचा दिवस आराम करण्याचा आहे पण अचानक बाहेर गावी जाण्याची शक्यता मुलासाठी सामान्य दिवस आहे शुभ रंग पोपटी
भाग्य 57%
कुंभ रास
गुरू व शुक्राचे आपणास पाठबळ मिळत असल्याने सर्व क्षेत्रात यशस्वी घोडदौड राहील
आज आर्थिक बाजू भक्कम राहील महिलांनी मुलांकडून फार अपेक्षा ठेवू नये
शुभ रंग पिवळा
भाग्य 88%
मीन रास
कार्यक्षेत्रात वर्चस्व गाजवाल वडिलांसोबत आज खूप छान वाटेल खूप गोष्टी शिकाल जोडीदाराशी उत्तम दिवस जाईल
शुभ रंग निळा
भाग्य 92%
शरद कुलकर्णी,पुणे 9689743507