लोककलेच्या माध्यमातून विविध विषयांवर आपल्या रसाळ वाणीने समाज प्रबोधन करणारे संत साहित्य आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, व्याख्याते, प्रवचनकार आणि भारूडकार दिवंगत
डॉ.रामचंद्र देखणे यांचा आज 12 एप्रिल हा जन्मदिवस आहे.त्यांच्या स्मृती निमित्त सांप्रदायिक सेवा आणि लोककला क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना डॉ.रामचंद्र देखणे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांचे चिरंजीव डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली.
प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प प्रमोद महाराज जगताप व लोककलाकार रघुवीर खेडेकर यांना हा पुरस्कार
ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
लोककला आणि लोकसंस्कृती हाच ध्यास आयुष्यभर जपणारे डॉ. रामचंद्र देखणे यांनी खऱ्या अर्थाने लोककला,भारुड,गोंधळ यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. ‘संत विचार प्रबोधिनी’ अशी दिंडी घेऊन त्यांनी अनेक वर्षे पंढरपूरची वारी केली. २६ सप्टेंबर २०२२ रोजी अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने सांस्कृतिक व साहित्य क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे.साहित्य तसेच वारकरी सांप्रदायातील त्यांच्या अमूल्य योगदानाप्रित्यर्थ त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात डॉ.रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानची सुरुवात होत आहे.

पिछला पद