June 1, 2023
PC News24
Other

भारतातील सर्वात वृद्ध अब्जाधीश, महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन एमेरिटस केशब महिंद्रा यांनी वयाच्या ९९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष एमेरिटस केशब महिंद्रा यांचे बुधवार, १२ एप्रिल २०२३ रोजी वयाच्या ९९ व्या वर्षी निधन झाले. INSPACE चे अध्यक्ष पवन के गोयंका यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली…

“औद्योगिक जगताने आज सर्वात महान व्यक्तिमत्व गमावले आहे. श्री केशब महिंद्रा यांच्या बरोबरीचं कोणीच नव्हतं; सर्वात छान व्यक्तीला जाणून घेण्याची संधी मला मिळाली. मी नेहमी त्यांच्या भेटीसाठी उत्सुक होतो आणि त्यांनी व्यवसाय, अर्थशास्त्र आणि सामाजिक बाबी कशा जोडल्या यावरून मला प्रेरणा मिळाली. ओम शांती,” असे पवन. के. गोएंका यांनी ट्विट केलं.

केशब महिंद्रा यांनी ४८ वर्ष M&M चे अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली होती.त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी अध्यक्षपद सोडले.फोर्ब्सच्या अलीकडील २०२३ च्या अब्जाधीशांच्या यादीत भारतातील १६ नवीन अब्जाधीशांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला असून ते आपल्या मागे $१.२ अब्ज संपत्ती मागे सोडून गेले. महिंद्राची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर इतकी होती.केंद्र सरकारने कंपनी कायदा आणि एमआरटीपी आणि केंद्रीय सल्लागार परिषद यासह अनेक समित्यांचा भाग म्हणून केशुबची निवड केली होती. तसेच त्यांनी २००४ ते २०१० पर्यंत ६ वर्षे नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य म्हणून काम केले होते.१९६३ ते २०१२ या काळात मुंबई-सूचीबद्ध समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. व्हार्टन, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे माजी विद्यार्थी म्हणून महिंद्रा यांनी महिंद्रा अँड महिंद्राचे भारतातील विलीस जीपच्या केवळ असेंबलरपासून वैविध्यपूर्ण समूहात परिवर्तन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
२०१२ मध्ये केशब महिंद्रा निवृत्त झाल्यावर त्यांचे पुतणे आनंद महिंद्रा समूहाचे उत्तराधिकारी बनले आहे

Related posts

पोक्सो अंतर्गत रोड रोमियोवर गुन्हा दाखल

pcnews24

पी टी उषा यांची आंदोलकांना भेट.(व्हिडिओ सह)

pcnews24

पिंपरी चिंचवडमधे घरगुती गॅसचा काळाबाजार.

pcnews24

वाकड भागातील मानकर चौक व कस्पटे वस्ती परिसरात सुमारे पाच तास वीज खंडित

pcnews24

महानगरपालिकेत होणार आशा स्वयंसेविका पदांची भरती.

pcnews24

Leave a Comment