November 29, 2023
PC News24
आमचे बोलणेखेळाजीवनशैली

सामान्य करदाता नागरिकाचे आयुक्तांना पत्र

सर्वसामान्य नागरिक जर जागृत असेल तर भविष्यात घडणाऱ्या दुर्दैवी घटना नक्कीच रोखल्या जाऊ शकतात.
असेच सामान्य करदाता असलेले एक सजग नागरिक कु.राहूल कोल्हटकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री शेखरजीसिंह यांना एक निवेदन दिले आहे. आता शाळांना उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत, त्यामुळे उन्हाळी शिबिरे आणि पोहण्याचे वर्ग यांची जोरदार सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने दर वर्षी पोहण्याच्या प्रशिक्षण शिबिरास जे तलाव देण्यात येतात त्यामध्ये काही प्रशिक्षक हे अनुभवी व मान्यताप्राप्त प्रमाणपत्र धारक असतात तर काहीजण कसलाही अनुभव नसलेले प्रशिक्षक सुद्धा प्रशिक्षण शिबिर घेतात, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने त्यांना मान्यता देण्यात येते.म्हणूनच यासंबंधीच्या निवेदनात कु.राहूल कोल्हटकर यांनी काही महत्वाच्या बाबी लक्षात आणून दिल्या आहेत.वैयक्तीक पातळीवर पोहण्याचे जे प्रशिक्षण शिबिर आयोजनासाठी घेण्यात येते त्या शिबिरास मान्यता देताना संस्थेच्या वतीने प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक तसेच जीवरक्षक यांचे प्रमाणपत्र व त्या कागदपत्रांची तपासणी करूनच प्रशिक्षण शिबिरास मान्यता देण्यात यावी असे म्हटले आहे.तसेच पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जलतरण तलावांवर मान्यता प्राप्त संस्थेच्या प्रशिक्षित प्रमाणपत्रधारक जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे का? याबाबतही तपासणी करण्यात यावी असे लिहिले आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने जलतरण तलावावर होणारी तिकीट विक्री ऑनलाईन पद्धतीने चालू केली आहे,ही प्रक्रिया खूप वेळकाढू आणि किचकट आहे,
त्यासाठी ऑनलाईन सोबत पूर्वीप्रमाणे ऑफ लाईन तिकीट विक्री चालू करण्यात आली तर त्याचा लाभ सर्वांना घेता येईल. शहरातील वेगवेगळ्या संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये काही लहान मुलेही असतात त्यामुळे काही चुकीची घटना घडू नये याकरिता शिबिरासाठी प्रशिक्षकांची मान्यता प्राप्त प्रमाणपत्र तसेच अनुभव याची पडताळणी करूनच प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यास मान्यता द्यावी असे सांगितले आहे.
पिंपरी चिंचवड आयुक्त श्री.शेखरजी सिंह यांना निवेदनाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिलेले मुद्दे किंवा मागण्या ह्या केवळ पोहण्याच्या प्रशिक्षणास येणाऱ्या लहान मुलांच्या व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असून लवकरात लवकर यावर योग्य तो निर्णय घेतल्यास नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड:कचरा विरोधात एकत्र! पुनावळे कचरा डेपो प्रकल्पाला सर्वपक्षीय नेत्यांचा विरोध.

pcnews24

शास्त्रीय कला केवळ मनोरंजन करण्यापुरत्या मर्यादित नसतात- ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे -संस्कार भारती‌ची अखिल भारतीय कार्यकारिणी बैठक पुण्यात संपन्न.

pcnews24

तळेगाव दाभाडे नगर परिषदे कडून रविवारी ई कचरा संकलन मोहीम.

pcnews24

आणखी पंधरा दिवस थांबा मग कळेल…

pcnews24

शहरातील पाच मोठ्या मॉलला नोटीसा.

pcnews24

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांची अचानक ‘सुखद’ भेट (विडिओ सह )

pcnews24

Leave a Comment