पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संगीत अकादमी मार्फत वासंतिक संगीत शिबिराचे मोफत आयोजन
सध्या शाळांना सर्वत्र उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून उन्हाळी सुट्टी म्हटले की पालकांची चांगल्या शिबिरांसाठी चौकशी सुरू होते.
तुम्ही सुद्धा तुमच्या पाल्यासाठी शिबिराचे नियोजन करित असल्यास ही बातमी आहे खास तुमच्यासाठी …
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या संगीत अकादमी मार्फत अनोख्या वासंतिक संगीत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १७ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ दरम्यान सकाळी १० ते सायं ५.३० या वेळात संगीत अकादमी,निगडी येथे हे शिबिर होणार आहे. अकादमीच्या वतीने शिबिराचा तपशील जाहीर करण्यात आला आहे
सोमवार पासून सुरू होणाऱ्या या वासंतिक संगीत शिबिरात नामवंत मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनचा लाभ घेता येणार आहे.
प्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित श्री.सुधीर नायक (हार्मोनियम वादन- सोमवार)सुप्रसिद्ध तबला वादक पद्मश्री पंडित श्री.विजय घाटे (तबला वादन- मंगळवार) मार्गदर्शन करतील.तर प्रसिद्ध संगीतकार श्री.सलील कुलकर्णी (सुगमसंगीत-बुधवार)
आणि प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका विदुषी डॉ.अलका देव मारुलकर
(शास्त्रीय गायन -गुरूवार)
हे मान्यवर या शिबिरात मार्गदर्शन करतील.
प्रात्यक्षिकासह आयोजित केलेले हे वासंतिक संगीत शिबिर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सर्व विद्यार्थ्यांकरीता मोफत होणार असल्याचे नमूद केले आहे.या शिबिराची नोंदणी करताना प्रशिक्षणार्थीने त्यांचे संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक द्यावा.
शिबिराच्या माहितीसाठी विषयानुसार पुढील क्रमांकावर मेसेज करावा असे कळवण्यात आले आहे.
हार्मोनियम (7559136802),
तबला (9881057776) सुगमसंगीत(9552532571)
शास्त्रीय गायन (9922502406)
वाद्यवादनात सहभागी विद्यार्थ्यांनी(हार्मोनियम ,तबला) शिबिराला येताना स्वतःची वाद्ये स्वतः आणायची आहेत.
या शिबिरास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील याची नोंद सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी.तसेच विद्यार्थ्यांनी येताना दररोज आपल्या बरोबर टिफीन आणि पाणी बाटली अवश्य आणायची आहे.