June 1, 2023
PC News24
जीवनशैलीदेशव्यवसाय

पिंपरी चिंचवड पुणे येथील फोर्सने मोटर्स ने आणली जबरदस्त कार

पिंपरी चिंचवड पुणे येथील फोर्सने मोटर्स ने आणली जबरदस्त कार…

टोयोटा इनोव्हा आणि मारुती एर्टिगा सारख्या 7-सीटर कार मोठ्या कुटुंबांसाठी आवडत्या ठरत आहेत, यात अधिक लोकांना एकत्र प्रवास करता येतो. पण भारतीय बाजारपेठेत या वाहनांना टक्कर देण्यासाठी पुण्यातील वाहन उत्पादक फोर्स मोटर्स (फोर्स मोटर्स) ने आपली १० आसनी कार लॉन्च केली आहे.

फोर्स मोटर्सने नुकतेच आपले प्रीमियम मोठे वाहन अर्बानिया देशात सादर केले आहे. व्यावसायिक वाहन उत्पादक करणाऱ्या या कंपनीने आता फोर्स सिटीलाइन १० सीटर एमयुव्ही कार बाजारात आणली आहे.ही दिमाखदार कार १५.९३ लाख रुपये किमतीत लॉन्च करण्यात आली आहे.

हे मॉडेल म्हणजे फोर्स ट्रॅक्स क्रूझरची अद्ययावत आवृत्ती आहे.२.६लीटर डिझेल इंजिनसह असलेल्या या कारचे वैशिष्ट्य म्हणजे प्रशस्त जागा.तिसर्‍या रांगेत साइड-फेसिंग जंप सीट्स ऐवजी,फोर्स सिटीलाइन समोरच्या सीट्ससह येते. क्रुझरपेक्षा वेगळे दिसण्या साठी सिटीलाइन मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.फोर्स सिटीलाइन फक्त एकाच प्रकारात उपलब्ध असून मोठ्या कुटुंबासाठी ही कार एक उत्तम पर्याय आहे.

फोर्स सिटीलाइनला एक नवीन फ्रंट फॅसिआ असून ज्यामध्ये नवीन लोखंडी जाळी आहे. MUV ला काळ्या रंगाचे ORVM आणि दरवाजाचे हँडल वगळता बॉडी रंगीत पॅनल्स मिळतात.याला २+३+२+३ सीटिंग लेआउट मध्ये समोरच्या सीट्स मिळतात.म्हणजेच
पहिल्या रांगेत चालक आणि सहप्रवासी, दुसऱ्या रांगेत तीन प्रवासी,
तिसऱ्या रांगेत दोन प्रवासी आणि शेवटच्या रांगेत तीन प्रवासी बसू शकतात. MUV ला दुसर्‍या रांगेत ६०:४० स्प्लिट बकेट सीट्स मिळतात. त्यामुळे तिसर्‍या आणि चौथ्या रांगेत सहज जाणे आणि येणे शक्य होईल.

फोर्स सिटिलाईन एमयुव्हीला मर्सिडीज बेन्झसारखे २.६ CR टर्बो डिझेल इंजिन मिळते जे ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे इंजिन ९१bhp पॉवर आणि २५०Nm टॉर्क जनरेट करते. १० सीटर या कारमध्ये सर्व-४ पॉवर विंडो, पॉवर स्टीयरिंग, पुढच्या आणि मागच्या प्रवाशांसाठी स्वतंत्र एअर कंडिशनिंग आणि ABS आणि EBD सारखी वैशिष्ट्ये आहेत.या कारला टॉर्शन बार फ्रंट स्प्रिंग आणि रियर पॅराबोलिक लीफ स्प्रिंगसह स्वतंत्र डबल विशबोन सस्पेंशन मिळते.

Related posts

लिंडा याकोरिनो ट्विटरच्या नवीन CEO ?

pcnews24

नवले ब्रीज ठरतोय Accident point.स्वामीनारायण मंदिर येथे भीषण अपघात

pcnews24

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

pcnews24

वाढत्या तापमानात घ्या आरोग्याची काळजी.

pcnews24

जे. पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर

pcnews24

जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी ग्रामपंचायतीला विशेष पंचायत पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव..

pcnews24

Leave a Comment