May 30, 2023
PC News24
धर्म

हरिनामाचा गजराने अवघी पंढरी पुन्हा एकदा दुमदुमणार…..संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर …

हरिनामाचा गजराने अवघी पंढरी पुन्हा एकदा दुमदुमणार…..संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर …

आळंदी मंदिर समितीकडून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ज्येष्ठ कृष्ण अष्टमी म्हणजेच दिनांक ११ जून २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे.
जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या वारीचा मुख्य सोहळा ११ जून रोजी संपन्न होणार आहे.
श्रीक्षेत्र आळंदी येथून माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर ही पालखी पुण्यातील भवानी पेठ, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, विमानतळ फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी अशा तब्बल १७ दिवसांच्या पायीवारीनंतर ही पालखी २८ जूनला पंढरपुर येथे प्रवेश करेल.त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच २९ जून रोजी पालखीची नगर प्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान करून ३जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपुरातच असेल.त्याच दिवशी श्रीविठ्ठल- रुक्मिणी भेटीनंतर पालखीचा परतीचा प्रवास वाखरीहून सुरु होईल.

त्याआधी आळंदीहून माऊलींची पालखी प्रस्थान ठेवण्यापूर्वी श्री संत तुकाराम महाराजांची पालखी श्री क्षेत्र देहू येथून एक दिवस आधी, म्हणजेच १० जून २०२३ रोजी ही पालखी ईनामदारसाहेब वाडा, देहू येथून प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर ही पालखी आकुर्डी, नानापेठ पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, उडंबडी गवळ्याची, बारामती, सणसर, आंथुर्णे, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोलीमार्गे वाखरीला पोहोचेल. २८ जून २०२३ ला पालखी पंढरपुरात संत तुकाराम महाराज मंदिराच्या नव्या इमारत मुक्कामी असेल. त्यानंतर २९जून २०२३ ला पालखीची नगर प्रदक्षिणा पार पडेल.अलंकापुरीत होणाऱ्या या सोहळ्यात यंदा भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

 

 

पुणे :संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात नंतर आता संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान रविवार दि.११जून रोजी
माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे. आळंदीतून निघून यंदाचा.पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.करण्यात येणार असून वारकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात येणार आहे.

१४ जून : रोजी पुण्याहून सासवडकडे प्रस्थान.
१५ जून : रोजी सासवड मुक्काम.
१६ जून : जेजुरी.
१७ जून : वाल्हे.१८ जून : श्रींचे नीरा स्नान, लोणंद.

11 जून 2023, रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदी मंदिराच्या दर्शन मंडपातून प्रस्थान ठेवणार आहे. ज्यानंतर ही पालखी वारकऱ्यांसह पुणे भवानीपेठ, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, विमानतळ फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी आणि पंढरपूर असा प्रवास करणार आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचाच उत्सव असणारी पंढरपूरची वारी काही महिन्यांत सुरु होणार असून, त्यासाठी आता संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होण्याचा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत

Related posts

चिंता करू नका, ग्राहकांना भुर्दंड नाही; UPI पेमेंटशी निगडीत ‘या’ गोष्टी समजून घ्या

Admin

लव जिहादच्या निषेधार्थ पुण्यात मोर्चा

pcnews24

नागपूर मधील श्री.गोपाल कृष्ण मंदिरासाठी वस्त्रसंहिता लागू

pcnews24

पुण्यात दहशतवादी संघटना PFI ने पाय पसरले.

pcnews24

पुण्यात विविध ब्राम्हण संघटनांतर्फे सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न

pcnews24

आमचं घर आम्हाला परत करा; भाडेकरूच्या मुजोरीला कंटाळून पुण्यात ज्येष्ठ दाम्पत्याचं उपोषण

Admin

Leave a Comment