वाकड भागातील मानकर चौक व कस्पटे वस्ती परिसरात सुमारे पाच तास वीज खंडित
तापमानाचा पारा सध्या चांगलाच वाढत असताना उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना विजेचा पुरवठा अचानक खंडित होतो, वाकड भागातील मानकर चौक व कस्पटे वस्ती या परिसरातील
राहिवाशांना सुमारे पाच तास वीज पुरवठा खंडित झाल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागला. संस्कृती सब स्टेशनमधील केबलमध्ये बिघाड झाल्याने सकाळी अकरा वाजता वीजपुरवठा खंडित झाली. काहींनी थोड्या वेळात वीज पुन्हा पूर्ववत होईल असे वाटत होते परंतु सर्व दुरुस्ती होण्यास तब्बल साडे चार पर्यंत वाट पहावी लागली.
घरातून ऑफिसची कामे (WFH) करणाऱ्या नोकरदारांची कामात व्यत्यय आला. गृहिणींची कामेही रखडली. याबाबत वाकड मधील रहिवाशांनी, सोसायटी धारकांनी रोष व्यक्त केला. ताथवडे महावितरण विभागीय कार्यालयाचे सह अभियंते सनी टोपे यांनी माहिती दिली की सब स्टेशन मधील केबल जळाल्याने ही वीज खंडित झाली होती. नेमका कोणता बिघाड झाला हे पाहण्यासाठी वेळ लागल्याने वीज पूर्ववत व्हायला थोडा उशिरा होत आहे.