उद्योगासाठी लागणारे भांडवल कसे मिळवणार?
जाणून घ्या विश्व मराठी परिषद आयोजित कार्यशाळेत…
कोणताही उद्योग उभारणीसाठी येणारी मुख्य समस्या असते ती म्हणजे भांडवल कसे मिळवायचे? भांडवल उभे करताना ते झटपट मिळावे अशी प्रत्येक उद्योजकाची अपेक्षा असते,परंतु नेमक्या कोणत्या मार्गाचा अवलंब करावा हे न कळल्याने त्यातून येणारे नकारात्मक विचार उद्योग उभारणीसाठी अडचणीचे ठरतात.परंतु भांडवल उभारणीचे अनेक मार्ग कोणते हे शिकवणारी कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने आयोजित केली आहे.उद्योगांना उत्तेजन देणे महत्वाचे असण्याच्या काळात या अभिनव ऑनलाईन कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे विश्व मराठी परिषद आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे. उद्योगासाठी भांडवल उभारणीसाठीची ही चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा दिनांक.१८ ते २१ एप्रिल दरम्यान दररोज संध्या. ८ ते ९ या वेळात होईल.या कार्यशाळेचे मार्गदर्शन प्रा. क्षितिज पाटुकले (सुप्रसिद्ध लेखक, उद्योजक)करणार असून अधिक माहितीसाठी या 7066251262 व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क करावा.