महापालिकेचे पर्यावरणपूरक ई-रिक्षांच्या वापराचे ‘लक्ष्य ‘
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी २०२६पर्यंत शहरात किमान ५० टक्के ई-रिक्षांचा वापर करण्याचे लक्ष्य समोर ठेवले असल्याची माहिती
दिली.वाहनांच्या वाढत्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महापालिकेचा
ई-रिक्षांच्या वापरावर भर असून, पर्यावरणपूरक वाहनांसाठी पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) सेल स्थापन करण्यात आला आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी उद्योग व वाहन संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत नुकतीच बैठक घेतली.यावेळी ईव्ही सेलने सीएनजी रिक्षांच्या तुलनेत ई-रिक्षा चालविण्याचे फायदे आणि इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांचे विविध प्रकार, तंत्रज्ञान व अर्थकारणाची माहिती रिक्षाचालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिली.