मी सावरकर -आम्ही सावरकर घोषणेने भोसरी परिसर दणाणला..
राज्यातील सर्वात मोठी गौरव यात्रा..
भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार व भाजपा शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्या पुढाकाराने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सन्मानार्थ भाजपा शिवसेना महायुतीच्या पुढाकाराने सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे.
ढोलताशा पथक आणि ‘मी सावरकर ‘ उल्लेख असलेल्या भगव्या टोप्या परिधान करून सावरकरांवरील ‘मी सावरकर -आम्ही सावरकर’ घोषणेने भोसरी परिसर दणाणून गेला होता. भारत माता की जय, जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय यासारख्या घोषणा देत या यात्रेत सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने सामील झाले होते. भोसरी पीएमटी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या गौरव यात्रेला सुरुवात झाली. दिघी रोड,आळंदी रोड वरून कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे या भव्य यात्रेची सांगता झाली.या सावरकर गौरव यात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हेमंत हरहरे,
चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर राहुल जाधव,
नितीन काळजे, माजी सभागृह नेते एकनाथ पवार,स्थायी समितीचे सभापती विलासमडेगिरी,
नितीन लांडगे यांच्यासह भाजपा शिवसेना महायुतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी यात्रेत सहभागी झाले होते.
अनेक सावरकर प्रेमी व हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सामील होते.या यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची समुद्रातील प्रसिद्ध उडी हा देखावा लक्षणीय ठरला. दिमाखात फडकवत हाती घेतलेले भगवे ध्वज यामुळे अवघा भोसरी परिसर भगवा झाल्याने यात्रेचा उत्साह शिगेला पोहोचला होता.