मुंबई पुणे महामार्गावर नवीन मार्गीका विकसित होणार … काय आहे मिसिंग लिंक प्रकल्प?
मुंबई- पुणे या दोन्ही शहरांत दररोज हजारो प्रवासी अनेक कारणांनी प्रवास करत असतात. महामार्गावर होणारे अपघात ही नित्याची बाब आहे.ते टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आता राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून खोपोली ते कूसगाव दरम्यान 19.80 किमीची नवीन मार्गीका विकसित होत आहे.हा प्रकल्प मिसिंग लिंक प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. सध्या या प्रकल्पाचे काम ६५ टक्के काम पूर्ण झाले असून ते युद्ध पातळीवर सुरू आहे.प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण झाल्यानंतर हा मार्ग प्रवाशांसाठी जानेवारी २०२४ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी माहिती मिळते.केवळ नऊ महिन्यात या प्रकल्पाचे पूर्ण काम होईल का ?याबाबत साशंकता असली तरी संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल असा दावा केला आहे