May 30, 2023
PC News24
आमचे बोलणेठळक बातम्यानिवडणूकमहानगरपालिकाराजकारण

पिंपरी चिंचवड मध्ये फूटिचे राजकारण कि राजकारणामूळे फूट !!!!

पिंपरी चिंचवड मध्ये फूटिचे राजकारण कि राजकारणामूळे फूट !!!! पिंपरी चिंचवड महापालिका विभाजन जिल्ह्यात चौथी महापालिका निर्माण होण्याची चर्चा.

आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.वेगाने होणारा पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता हडपसर-वाघोली अशी तिसरी महापालिका अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने सरकारची तयारी सुरू झाली असताना, शेजारील पिंपरी चिंचवड महापालिकेचेही विभाजन करून जिल्ह्यातील चिंचवड-वाकड-हिंजवडी अशी चौथी महापालिका निर्माण करण्याची चर्चा सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी छोट्या महापालिका असणे योग्य असल्याचे विधान केले,त्या दृष्टीने होणारी ही चर्चा महत्वाची आहे . आताच्या पिंपरी- चिंचवड महापालिकेत देहू, आळंदी, चाकण, तळेगाव परिसराचा वेगाने होणारा अनियंत्रीत विकास पाहता हा परिसर समाविष्ट होण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पायाभूत सुविधांचा लाभ शहराच्या हद्दी बाहेरील आजूबाजूच्या गावांनाही करून द्यावा लागतो, मात्र त्या गावातील महसूल ग्रामपंचायतींकडे जमा होतो.त्यामुळे ही गावे शहरातच समाविष्ट करावीत असा मतप्रवाह आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका सभेने शहरालगतचे हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, गहुंजे, कासारसाई ही सात गावे महापालिकेत विलीन करण्याचा ठराव मंजूर केला.येथे राष्ट्रवादी बहुल मतदार असल्याने या गावांचा समावेश करण्याचा निर्णय अखेर पर्यंत होऊ शकला नाही.
तर चिंचवड-वाकड या आयटी बहुल मतदारांचा कल भाजपच्या बाजुने आहे, त्यामुळे हा भाग जोडून चौथी महापालिका निर्माण केली तर येथेही भाजपची सत्ता शक्य आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र असलेल्या नवीन महापालिकेत चिंचवड गाव, थेरगाव, वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पुनावळे, ताथवडे, वाल्हेकरवाडी, किवळे, मामुर्डी या भागाचा समावेश होईल दुसरीकडे पवना नदीच्या पुर्वेकडील भाग हा आता अस्तित्वात असलेल्या महापालिकेत कायम ठेवला जाईल.
चिंचवड मतदार संघात आमदार अश्विनी जगताप आणि भोसरीमध्ये आमदार महेश लांडगे यांच्या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रभावाचा फायदा लक्षात घेऊन नव्या महापालिका रचनेतही यश मिळवायचे असा भाजपाचा निर्धार आहे.

Related posts

येडेश्वरी देवीच्या यात्रेहून परतताना यात्रेकरूंच्या बसला भीषण अपघात.

pcnews24

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरिक ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना.

pcnews24

CBSE – बारावीचा निकाल जाहीर

pcnews24

‘मविआच्या सरकारमध्ये मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्या’मोठ विधान

pcnews24

बृजभूषण सिंग राजीनाम्यास तयार,परंतु खेळाडूंनची अटकेची मागणी‌.

pcnews24

आगामी आर्थिक वर्षात देशातील गेमिंग इंडस्ट्री तेजीत,”फ्रेमबॉक्स ऍनिमेशन इन्स्टिटयूटमधे“आर्टबॉक्स”चे प्रदर्शन.

pcnews24

Leave a Comment