गुगल लोकेशनच्या रिव्ह्यू टास्कद्वारे ऑनलाइन फसवणूक,तब्बल १२लाख ८५ हजाराला गंडा.
दैनंदिन जीवनशैलीत स्मार्ट फोनचा वापर ही गरज झाली असली तरी त्याच्या होणाऱ्या गैरवापरातून फसवणूक होण्याची शक्यताही असते.असाच एक फसवणुकीचा अजब प्रकार नुकताच पिंपरी परिसरात घडला.२७ मार्च रोजी वाकड परिसरात रहाणारे संजय दशरथ अमृतकर (वय ५१) यांची फसवणूक झाल्याची ही घटना आहे.एका व्हाट्सअप मेसेजवर गुगल लोकेशनला रिव्ह्यू दिल्यास त्याचे तुम्हाला दीडशे रुपये देऊ असे प्रथम सांगितले. ऑनलाईन पद्धतीने आरोपी जेम्स, पूजन यांनी तक्रारदार अमृतकर यांना पद्धतशीर आपल्या जाळ्यात ओढले,त्यासाठी टेलिग्रामवरील एक ग्रुप जॉईन करण्यास सांगून दिवसाला २४ टास्क पूर्ण खेळल्यास टास्कच्या चार पट रक्कम मिळेल असे आमिषही दाखवले. तक्रारदाराने हा टास्क पुढे सुरू ठेवण्यासाठी काही रक्कम भरणे गरजेचे आहे असे सांगून सुरुवातीला १५०००नंतर एक लाख वीस हजार आणि त्यानंतर साडेतीन लाख अशा स्वरूपात तब्बल १२लाख ८५ हजार रुपये आरोपीने लुटलेले आहेत.