हिंजवडीत लग्नाचे आमिष दाखवून अत्याचाराची घटना.
हिंजवडी भोसरी परिसरात जुलै २०१९ ते सप्टेंबर २०२२ या दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून महिले वर अत्याचार करण्याची घटना घडली आहे. संबंधित महिलेने सोमवार, दि.१० रोजी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी राकेश रवींद्रनाथ नायर (वय २२,भोसरी) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने त्यांच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले व तब्बल तीन लाख रुपये घेत मानसिक व शारीरिक त्रास दिला असे फिर्यादीत नमूद केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.