प्रतिष्ठित शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रस्तावांचा छाननी तक्ता प्रकाशित
राज्य शासनाचा प्रतिष्ठित समाजाला जाणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी मागवण्यात आलेल्या प्रस्तावांचा प्राथमिक छाननी गुणांकन तक्ता
शासनाकडून प्रकाशित करण्यात आला आहे,या तक्त्यात दिलेल्या माहितीवर काही आक्षेप असेल तर १५ एप्रिल २०२३ पर्यंत क्रीडा व युवक सेना संचालनालय कळवण्याचे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.
दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव राज्य शासनाकडून करण्यात येतो. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडूंसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार व दिव्यांग खेळाडूंसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात.
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांचा प्राथमिक छाननी गुणांकन तक्ता यासाठी क्रीडा व युवक संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in/
या संकेतस्थळावर पाहता येईल,यात ‘पुरस्कार’ या टॅबमधे तो प्रकाशित करण्यात आला आहे