November 29, 2023
PC News24
ठळक बातम्यादेशराजकारण

देशातील करोडो लोकांना दिलासा,मोदी सरकारकडून करात मिळणार सूट.

देशातील करोडो लोकांना दिलासा,मोदी सरकारकडून करात मिळणार सूट.

फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३ चा अर्थसंकल्प सादर करताना नवीन कर प्रणालीमध्ये आयकर सवलत वाढवून ७ लाख रुपये केली असल्याची घोषणा केली होती तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न ७ लाखांपर्यंत आहे त्यांना आता कर भरावा लागणार नाही असे सांगितले होते.
नवीन कर प्रणाली अंतर्गत कर भरला तर करदात्यांना सात लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
यापूर्वी वार्षिक ५ लाख रुपये इतकी मर्यादा होती.करमुक्ती वाढवून देशातील करोडो जनतेला दिलासा देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.
पगारदार आणि पेन्शनधारक आता नवीन कर प्रणाली अंतर्गत कर भरतात,त्यानंतर त्यांना ५०,००० रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल. अशा परिस्थितीत, नवीन कर प्रणालीमध्ये वार्षिक सात लाख रुपये कमावल्यानंतर, स्टैंडर्ड डिडक्शन अंतर्गत ५० हजार रुपयांची सूट देखील मिळेल. लोकांच्या हितासाठी अनेक योजना सरकार कडून राबविल्या जातात. या माध्यमातून सरकार विविध वर्गातील लोकांना दिलासा देण्याचेच काम करत आहे

Related posts

पिंपरी चिंचवड: नितीन गडकरी यांचा गुरुवारी पिंपरी चिंचवड दौरा

pcnews24

रावेतचे वैभव असलेले ‘मेट्रो इको पार्क’ वाचवा …

pcnews24

भाजपच्या बड्या नेत्यासह 4 माजी नगरसेवकांचे राजीनामे

pcnews24

एकमेकांना विरोधात वक्तव्ये न करण्याची काँग्रेस मंत्र्यांना दिली समज

pcnews24

वाकड भागातील मानकर चौक व कस्पटे वस्ती परिसरात सुमारे पाच तास वीज खंडित

pcnews24

दिल्ली:डीपफेक व्हिडिओप्रकरणी अधिकारी नियुक्त.

pcnews24

Leave a Comment