March 1, 2024
PC News24
आमचे बोलणेठळक बातम्यादेशराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्लीतला भूखंड गमावला,आता बंगलाही काढून घेतला जाण्याची शक्यता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिल्लीतला भूखंड गमावला,आता बंगलाही काढून घेतला जाण्याची शक्यता.

आणखी एक झटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केला आहे,त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्लीत देण्यात आलेला बंगलाही काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली सरकारकडून लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआयला तशी नोटीस दिली जाऊ शकते. असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस, CPI यांच्यासोबत तृणमूल काँग्रेस पक्षाला दिल्लीत देण्यात आलेली जमीन गमवावी लागू शकते.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी भूखंडाची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार राष्ट्रवादीकडून अनेक भूखंड पाहण्यातही आले होते. मात्र, कोणतीही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अद्यापपर्यंत पसंत न पडल्यामुळे पक्ष कार्यालय बांधण्यात आले नव्हते.परंतु आता राष्ट्रीय दर्जा मिळालेला अरविंद केजरीवाल यांचा ‘आप’पक्ष गृह व नागरी कामकाज मंत्रालयाकडून पक्ष कार्यालयासाठी तातडीने भूखंडाची मागणी करू शकतो.
भुखंडा बरोबरच सरकारी बंगले काढून घेण्याच्या हालचाली सुरु झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला कॅनिंग रोडवर पक्ष कार्यालयासाठी देण्यात आलेला बंगलाही सोडावा लागेल. यावर राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Related posts

लोक माझे सांगाती पवारांचे ठाकरेंवर टीकास्त्र…

pcnews24

भोसरी एमआयडीसी मध्ये विनापरवाना झाडे तोडली; कंपनी मालक व ठेकेदारावर गुन्हा.

pcnews24

G-20 परिषदेच्या थेट प्रक्षेपणाची जबाबदारी प्रमोद दाभोळे या मराठमोळ्या युवकावर; भारतानं टाकला विश्वास! मीडिया कोऑर्डिनेटर म्हणून निवड

pcnews24

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे लढाऊ विमानात उड्डाण!!!

pcnews24

मुंबईत पोहोचताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

pcnews24

‘तुरूंगात टाकले तरी लढत राहणार’ :शरद पवार.

pcnews24

Leave a Comment