क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या पाच बुकिंना घेतले ताब्यात
,चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीच्या बंद फ्लॅटमध्ये होता सट्टा सुरू.
चिंचवडमधील एका उच्चभ्रू सोसायटीच्या बंद फ्लॅटमध्ये सट्टा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट २ यांना चिंचवडगाव येथील मेट्रो पॉलिटिन सोसायटी येथे सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या सोसायटीतील बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर ६०२ मध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा घेत असल्याची माहिती नुसार पोलिसांनी छापा टाकून ही मोठी कारवाई केली आहे.
आयपीएल क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीर सट्टा घेऊन या इसमांनी बेहिशोबी आर्थिक उलाढाल करून शासनाची फसवणूक केली आहे.महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये अवैधरित्या जुगार चालविल्याने यावर कायदेशीर कारवाई करुन चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून१४ मोबाईल, १ लॅपटॉप, २ वायफाय, २ कॅल्क्यूलेटर, जुगाराची साधने व रोख रक्कम असा सुमारे एक लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल सापडला आहे.या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या बुकींच्या मोबाईलमध्ये ताज ७७७ नावाच्या अॅपवर टीव्हीवरील प्रक्षेपणापूर्वी एक बॉल अगोदर दिसतो, याचा फायदा घेऊन ते क्रिकेट सामन्यावर लोकांकडून ऑनलाईन सट्टा घेत होते.
याप्रकरणी गोविंद प्रभुदास लालवानी (वय ४५ वर्ष) , कन्हैयालाल सुगुणुमल हरजानी (वय ६१ वर्ष), देवानंद प्रतापराय दरयानी (वय ५१ वर्ष), नीरमेश दयाराम मिरानी (वय ६३ वर्ष), हरेश हनुमंत थटाई (वय ५८ वर्ष, सर्व राहणार पिंपरी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने व पोलीस अंमलदार जयवंत राऊत, प्रमोद चेताळ, देवा राऊत, सागर अवसरे यांचे पथकाने मेट्रोपोलीटीन सोसायटीत सापळा लावून केली.