December 11, 2023
PC News24
आमचे बोलणेधर्मसामाजिक

रा.स्व.संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

रा.स्व.संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.

दि.१४ रोजी सकाळी ७.३० वाजता पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संघ कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय जिल्हा संघचालक विनोद बन्सल, जनकल्याण समितीचे विनोद देशपांडे, महेंद्र बोरकर, नरेंद्र पेंडसे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते व स्वयंसेवक उपस्थित होते.

समरसता मंचातर्फे पाणपोई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दरवर्षी रा.स्व. संघाच्या समरसता विभागाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम, व्याख्यान, उपक्रमांच्या आयोजनासोबतच पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्थानी अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सामाजिक समरसता मंच व स्व.तात्या बापट स्मृती समिती यांचे वतीने पाणपोईची सोय देखील करण्यात येत असते. १९८९ पासून कोरोना प्रादुर्भावाचा दोन वर्षाचा अपवाद वगळता गेल्या ३० वर्षांपासून ही अविरत सेवा सुरू असल्याचे समरसता मंचच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. यावर्षी समरसता मंचाच्या पाणपोई चे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल, सांगवी गट संघचालक लक्ष्मण पवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पंजाब मोंढे, बाळासाहेब सुबंध प्रामुख्याने उपस्थित होते. अभिवादन स्थळी येणाऱ्या नागरिकांनी या पाणपोईचा लाभ घेतला. याच बरोबर पर्यावरण संरक्षण गतिविधि तर्फे हरित घर उपक्रमाची प्रदर्शनी लावण्यात आली होती.

Related posts

मराठा आंदोलनामुळे प्रवाशांना मनस्ताप तर STचे १५ कोटींचे नुकसान

pcnews24

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी यांच्यातर्फे सावरकर जयंती रक्तदान करून साजरी

pcnews24

मुंबई:उद्योगपती रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान.

pcnews24

पिंपरी चिंचवड: पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयोजित केला पोलीस पाटील यांचा मार्गदर्शन मेळावा.

pcnews24

बुधवार पेठेतील महिलांसाठी असाही एक हात मदतीचा,मंथन फाउंडेशन व महाएनजीओ फेडरेशनचा उपक्रम

pcnews24

महाराष्ट्र:’सरकारकडून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचे काम’.

pcnews24

Leave a Comment