खासगी बस चालकाचा ताबा सुटल्याने बस दरीत कोसळून भीषण अपघात,जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पहाटे भीषण अपघात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तीव्र दुःख व्यक्त
जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पहाटे चारच्या सुमारास बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ खाजगी बस दरीत कोसळल्याची घटना घडली. या बसमध्ये ४० ते ४५ लोक असून यातील १३ जणांनचा मृत झाल्याचे आणि ३० हून अधिक लोक जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
लोणावळ्याजवळ असलेल्या बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने ही खासगी बस निघाली होती, यावेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये आणखी प्रवासी अडकलेले असल्याची शक्यता वर्तवली जात असून युद्ध पातळीवर बचावकार्यसुरू आहे.या खाजगी बसमध्ये गोरेगाव (मुंबई) येथील बाजी प्रभु वादक गट (ढोलताशा पथक)चे प्रवासी असून ते पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
महामार्गावर चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून बस अपघाता विषयी तीव्र दुःख व्यक्त केले आहे शासनातर्फे मृतांना व जखमींना तातडीने योग्य ती मदत पुरवली जाईल असे म्हटले आहे. रायगड अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंडामधून दोन लाख व जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी खोपोली बस अपघात दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः एमजीएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
एमजीएम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या जखमींची नावे :
१)आशिष विजय गुरव,(19 वर्षे, दहिसर मुंबई.)
२) यश अनंत सकपाळ, (वय 17 वर्ष, गोरेगाव,) मुंबई. ३) जयेश तुकाराम नरळकर,वय 24 वर्षे, कांदिवली, मुंबई.
४) वृषभ रवींद्र कोरमे, वय 14 वर्षे, गोरेगाव, मुंबई.
५) रुचिका सुनील डुमणे, वय 17 वर्षे, गोरेगाव, मुंबई.
६) आशिष विजय गुरव, वय १९ वर्ष, दहिसर, मुंबई ७)ओंकार जितेंद्र पवार, वय 25 वर्षे खोपोली, रायगड.
८) संकेत चौधरी, वय 40 वर्ष,गोरेगाव, मुंबई. ९)रोशन शेलार, वय 35 वर्ष, मुंबई १०)विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 वर्ष, गोरेगाव, मुंबई
११) निखिल संजय पारकर, वय 18 वर्ष, मुंबई.
१२) युसुफ मुनीर खान, वय 13 वर्ष, मुंबई
१३) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15 वर्ष, सांताक्रुज, मुंबई
१४) अभिजीत दत्तात्रेय जोशी वय 20 वर्षे, गोरेगाव मुंबई.
१६) मोहक दिलीप सालप, वय 18 वर्षे, मुंबई.
१७) दिपक विश्वकर्मा, वय २०वर्ष, गोरेगाव, मुंबई
१८) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम, वय १८ वर्ष, गोरेगाव,मुंबई.
खोपोली नगरपालिका हॉस्पिटल मधील जखमींची नावे
१) नम्रत रघुनाथ गावनुक, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई.
२) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 वर्ष, गोरेगाव, मुंबई ३) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई
४) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 वर्ष, विरार.
५) महेश हिरामण म्हात्रे, वय २० वर्षे, गोरेगाव, मुंबई
६) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, वय 16 वर्ष, गोरेगाव, मुंबई
७) शुभम सुभाष गुडेकर, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई
८)ओम मनीष कदम, १८वर्ष, गोरेगाव, मुंबई.
९) मुसेफ मोईन खान,वय २१ वर्ष, गोरेगाव, मुंबई
खाजगी रुग्णालय जाकोटिया रुग्णालय खोपोली जखमीची नावे:-
१) सनी ओमप्रकाश राघव, वय २१ वर्ष, खोपोली,रायगड.
खालापूर रुग्णालयात मयत नावे.
१) जुई दिपक सावंत, १८ वर्ष, गोरेगाव, मुबई