🙏श्री गणेशाय नमः 🙏
आज रविवार दिनांक 16 एप्रिल 2023
आज वरुथिनी एकादशी आहे
आज आपण प्रत्येक राशींचे साप्ताहिक भविष्य जाणून घेऊ या
या सप्ताहात चंद्राचे भ्रमण कुंभ मीन मेष व वृषभ राशीतून होत आहे
रवि बुध राहू मेष राशीत
शुक्र वृषभेत मंगळ मिथुनेत शनि कुंभेत व गुरु मीन राशीत तर केतू
तुळ राशीत राहील
मेष रास
रविवार सोमवार आपल्यासाठी यशस्वी दिवस राहतील महत्वाचे कामे या दिवशी करून घ्या मंगळवार प्रतिकूल राहील मानसिक त्रासाचा दिवस वादविवाद मंगळवारी व बुधवारी टाळावेत अनावश्यक खरेदी कराल वाहन सावधतेने चालवा गुरुवार
शुक्रवार तुमच्यासाठी भाग्याचे ठरणार आहेत
शनिवार रविवारी जपून व्यवहार करा महिलांना गुरुवार शॉपिंग करण्यास
चांगला राहील
वृषभ रास
सोमवारी मंगळवारी आपणांस खूप धावपळ करावी लागेल कामाची जबाबदारी वाढेल बुधवार गुरुवार धावपळ कमी राहील चांगली बातमी मिळेल शनिवारी
प्रकृतीची तक्रार राहील
मिथुन रास
सुरुवात प्रवासाने होईल सोमवार मंगळवार अधिकारी आपल्या कामाची वाहवा करतील
बुधवार गुरुवारी आर्थिक प्राप्तीत भर पडेल शुक्रवार भाग्यवान दिवस राहील शनिवार आरामाचा दिवस राहील
कर्क रास
तुम्हाला गुरु शुक्र रवि ग्रहांची साथ लाभत आहे
आठवडा सुरुवातीला कंटाळवाणा वाटला तरी मंगळवारपासून हा सप्ताह उत्साहात जाईल
पाहुण्यांच्या भेटी गाठी होतील जुन्या आजारातून
सुटका होईल
सिंह रास
या आठवड्यात जोडीदाराचे सहकार्य छान राहील वरिष्ठ तुमच्यावर खूष असतील
मुलांचे प्रश्न मार्गी लागतील दूरचा प्रवास सोमवारी टाळावा
कन्या रास
मुले तुमच्या पासून 2 दिवसासाठी दूर जातील आप्तेष्टांच्या भेटी गाठी होतील तरुणांचे विवाह जुळतील शनिवारी आईच्या तब्येतीची काळजी घ्या
तुळ रास
या आठवड्यात आपणांस रवी बुध गुरु शुक्र शनि ग्रहांचे सहकार्य
लाभत आहे मुलांची प्रगती उत्तम राहील मंगळवारी जोडीदाराशी थोडे मतभेद होतील शनिवारी आर्थिक प्राप्ती वाढेल बुधवारी प्रवास टाळावा
वृश्चिक रास
शनि गुरु शुक्राची उत्तम या आठवड्यात तुम्हाला लाभेल रविवार सोमवार
आनंदी वातावरणात जातील मंगळवार बुधवार कामात कसा वेळ गेला कळणार नाही मुलांची प्रगती पाहून खूष
राहाल प्रवासाची शक्यता
कमी वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळवाल शुक्रवार शनिवार चांगली बातमी मिळेल
धनु रास
सोमवार मंगळवार छोटया प्रवासाचे योग वाहन खरेदीचा योग
इस्टेटचे वाद मार्गी लागतील बुधवारी प्रवास टाळावा गुरुवार शुक्रवार
तरूणांना प्रेमात यश
शनिवारी वादविवाद टाळावेत
मकर रास
गुरु शुक्र शनि अनुकूल आहे रवि उच्च राशीत आहे पण आपणांस अष्टमेश असल्याने तो प्रतिकूल होत आहे तब्येतीची काळजी घ्या आर्थिक स्थिती उत्तम राहील शुक्रवार शनिवार सर्व इच्छा पूर्ण करणारे ठरतील
कुंभ रास
आपणांस गुरु शुक्र रवी शनीची उत्तम साथ आहे आठवडा धावपळीत जाणार कौटम्बिक सुख उत्तम लाभेल मतभेद राहणार नाही दूरच्या प्रवासाचे योग बढतीचे योग आहेत
मीन
गुरु शुक्र शनीचे पाठबळ आहे सोमवार मंगळवार फारशी धावपळ राहणार नाही शुक्रवार शनिवार प्रवासाचे योग गुरुवारी वादविवाद टाळा स्पर्धा परीक्षेत यश मिळेल
श्री शरद कुलकर्णी
ज्योतिष अलंकार पुणे
9689743507