आमदारांचे स्टिकर लावलेले ‘ते ‘ वाहन अखेरीस पोलिसांना सापडले.
आमदारांच्या वाहनांवर जसे महाराष्ट्र विधानसभा सदस्य असे स्टिकर लावलेले असते,तशीच एक बरेच दिवसांपासून शोधत असलेली चारचाकी क्रेटा गाडी अखेर सासवड शहरात पोलिसांनी जेजुरी नाक्यावर पकडली आहे.
आमदार स्टिकर लावलेल्या ह्या गाडीची पोलिसांनी तपासणी केली असता कोणीही आमदार वाहन चालवत नव्हते अथवा कोणत्याही आमदाराच्या मालकीती गाडी नव्हती त्यामुळे वाहतूक नियमानुसार पोलिसांनी तो स्टिकर काढून घेतला या प्रकरणात
गाडीचा वाहक ऋतुराज गायकवाड काळेवाडी (रा.दिवे.पुरंदर)ताब्यात घेतले आहे.आमदार झाल्यासारखे वाटत असलेल्या या वाहन चालकाकडे
फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या या क्रेटा वाहनाचा कोणताही परवाना नसल्याने मोटार वाहन कायद्यान्वये ६ हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे.
वाहनांवर अशा कोणत्याही फॅन्सी नंबर प्लेट अथवा कोणतेही स्टिकर लावलेले असल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी दिला आहे.