डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगांव निवासस्थानी १८ तास वाचन उपक्रम
जयंती दिनाचे विशेष औचित्य…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि महाबोधी मैत्रेय परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. १३) १८ तास अभ्यास अभिवादन उपक्रम राबविण्यात आला.
हरणेश्वरवाडीतील डॉ. आंबेडकर निवासस्थानी आयोजित अभ्यास अभिवादन उपक्रमात २६ विद्यार्थी सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत सलग १८ तास वाचनासाठी बसले होते. शंभरहून अधिक वाचकांनी तीन, सहा, आठ, बारा तास वाचन उपक्रमात आपला सहभाग नोंदविला. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश जवदवाड यांनी उपक्रमास भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲड. रंजनाताई भोसले आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सहभागी वाचकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले
