डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवार पेठेतील महिलांना पोषण आहार वाटप – मंथन फाउंडेशन
सामाजिक न्याय सप्ताह अनुषंगाने मंथन फाउंडेशन व महा एनजीओ फेडरेशन द्वारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुधवार पेठेतील महिलांना पोषण आहार वाटप सेवा उपक्रम करण्यात आला. उपक्रमामध्ये संस्थापक शेखर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाने ९० गरजू महिलांना पोषण आहार वाटप करण्यात आला. यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले .
मंथन फाउंडेशन च्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी संस्थेच्या कामाबद्दल माहिती दिली. विशेष सहकार्य राजेंद्र तापडिया भगीरथ तापडिया ट्रस्ट व महा एनजीओ फेडरेशन.
यावेळी महा एनजीओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले व ज्येष्ठ संचालक मुकुंदजी शिंदे, संचालक अमोल उंबरजे व मान्यवर उपस्थित होते. तसेच मंथन फाउंडेशन चे कार्यकर्ते अंजली नाटेकर, राधा पाटील, रमा, सारिका चव्हाण, गयाबाई हणमंते, मेरी, छाया साळुंके यांनी कार्यक्रम यशस्वी केला.