श्री गणेशाय नमः
सोमवार १७ एप्रिल २०२३
शालिवाहन शके १९४५
ब्रह्मा योग बालव करण
आज चंद्र कुंभ राशीत असणार आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र राहील
दिन विशेष सोमप्रदोष
चैत्र कृष्ण द्वादशी
रवी बुध राहू मेष राशीत केतु तूळ राशीत
शुक्र वृषभ व मंगल मिथुन राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून प्रत्येक राशीचे आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
आजचा आपला दिवस आनंदाचा जाणार आहे जुने मित्र भेटतील आर्थिक लाभ होईल प्रवासात लाभ होतील
वृषभ रास
उत्साहपूर्ण दिवस जाईल वरिष्ठ तुमच्या कार्याची दखल घेतील नवीन वाहन खरेदी होईल
मिथुन रास
आज धार्मिक स्थळाला भेट द्याल आज इतरांकडून कामे करून घ्याल विदयार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी उत्तम दिवस आहे
कर्क रास
आज चंद्र प्रतिकूल आहे सावधपणे कामे करा छोटीशी चूक रुद्र रूप धारण करू शकते प्रवास टाळा वादविवादात पडू नका
सिंह रास
जोडीदाराची उत्तम साथ लाभेल मित्रांबरोबर आनंदात दिवस जाईल वरिष्ठ कामाची स्तुती करतील मुलांकडे लक्ष ठेवा
कन्या रास
स्पर्धेत भाग घ्याल व यशस्वी व्हाल आजोळीकडून लाभ राहील मुले त्रास देतील प्रवासात किंमती सामान सांभाळा.
तुळ रास
आज लाभदायी दिवस आहे शेयर मध्ये लाभ राहील जोडीदाराची उत्तम साथ मिळेल मुलासोबत वेळ घालवाल
वृश्चिक रास
आज सुग्रास भोजनाचा आनंद घ्याल आरोग्य ठणठणित राहील शांत झोप लागेल आईकडून शुभवार्ता कळेल
धनु रास
प्रवास करावा लागेल अपेक्षित पत्र येईल भाऊ मदतीला धावून येईल
मकर रास
खर्चाचे प्रमाण वाढेल मानसिक ताण वाढणाऱ्या गोष्टी घडतील पण तुमची रास विचारी असल्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल पाहुणे येतील
कुंभ रास
तुम्हाला चंद्र अनुकूल आहे शेवटी तुम्ही जे ठरवता तसेच होते दिवस लाभदायक जाईल रात्री तब्येतीला जपा
मीन रास
आज कालच्या दगदगीने खूप थकल्या सारखे वाटेल अनावश्यक खर्च होईल काकांकडे लक्ष द्यावे लागेल प्रवास टाळा
श्री शरद कुलकर्णी
ज्योतिष अलंकार पुणे
9689743507