महविकास आघाडीच्या ‘वज्रमूठ सभेचे ‘पिंपरी चिंचवडमधे जोरदार आयोजन
महायुतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडी सध्या मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करते आहे त्यासाठी राज्यभरात ‘वज्रमूठ सभां’चे आयोजन कर ण्यात येत आहे. नागपूर येथे झालेल्या कालच्या वज्रमूठ सभेनंतर आता पिंपरी चिंचवड मतदासंघात पुढील वज्रमूठ सभा होणार असल्याचे समजते.
या बाबतची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व राष्ट्रवादीचा असलेला प्रभाव लक्षात घेता ही वज्रमूठ सभा
पिंपरी- चिंचवडमधील एच. ए. मैदानावर होणार असून राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सभा यशस्वी करण्याची जबाबदारी दिली आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील यासभेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा स्वतः शरद पवार तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते.
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या पुढाकाराने सावरकर गौरव यात्रा काढली होती.त्या पार्श्वभूमीवर स्थानिक आणि राज्य पातळीवरील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या वज्रमूठ सभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
सभेच्या तयारीची जबाबदारी निवडणूक प्रभारी योगेश बहल,
स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांच्या कडे सोपविण्यात आली आहे.
पिंपरी,चिंचवड, मावळ,
भोसरी आणि पुणे येथील कार्यकर्त्यांसाठी असेलेले मध्यवर्ती ठिकाण म्हणून एच.ए मैदानाची निवड केल्याचे समजते.