आणखी पंधरा दिवस थांबा मग कळेल.
वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट.
महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात पुढील पंधरा दिवसात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या एका पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते, याप्रसंगी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर पत्रकारांशी संवाद साधताना आगामी पंधरा दिवसात महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. नेमके काय घडेल हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले असून पंधरा दिवसानंतर तुम्हाला समजेलच असे ते म्हणाले.
राज्य सरकारच्या अधिकारात असलेला महाराष्ट्र भूषण हा सन्मान देताना पुरस्कार देणाऱ्याची जात काढू नये असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
अतिक आणि अश्रफ अहमद यांचा एन्काऊंटर म्हणजे एकीकडे गुन्हेगारांना कायद्याने आळा घालायचा तर त्याचवेळी गुन्हेगारांना गोळी घालण्याचा प्रकार सुरू आहे.
पुलवामा हल्ल्याबद्दल मी यापूर्वीच प्रश्न उपस्थित केला असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. सत्यपाल मलिक आत्ता याबाबत बोलत आहेत पण मी हे त्याच वेळेस बोललो होतो दहा गाड्यांच्या ताब्याबद्दलची माहिती साधी कॉन्स्टेबलला होती ती यांना कशी नव्हती असा आजही माझा प्रश्न आहे.