पडक्या घराची भिंत कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू.राजगुरुनगर आझाद चौकातील दुर्दैवी घटना
राजगुरुनगरच्या आझाद चौकात स्वप्निल गोडसे यांच्या जुन्या पडक्या घराची भिंत पाडण्याचे काम विजय वाडेकर व स्वप्नील पांचाळ या मजुरांनी हाती घेतले होते. काम सुरू असताना अचानक घराची मातीची भिंत कोसळली या मातीच्या ढिगार्यात विजय वाडेकर पूर्णपणे गाडले गेले होते. सुनील पांचाळ यांच्या अंगावर माती,विटा पडल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भिंत कोसळल्याची घटना समजताच तातडीने खेड पोलीस घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या व जेसीबीच्या साह्याने मातीचा ढिगारा बाजूला करून या दोन्ही व्यक्तींना बाहेर काढण्यात आले.