पुण्याच्या नवले पुलावर संध्याकाळी खोबरेल तेल घेऊन निघालेल्या टँकरचे ब्रेक अचानक फेल झाले v चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मध्ये असलेल्या दुभाजकाला धडकून टँकर महामार्गावर उलटल्याची घटना घडली आहे.
टँकर उलटल्याने त्यातील तब्बल २४ हजार लिटर खोबरेल तेल रस्त्यावर सांडले असून अक्षरशः रस्त्यावर तेलाची नदी वाहू लागली होती. रस्त्यावर सर्वत्र तेल सांडल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढली त्यामुळे वाहतूक मंदावली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.अपघात घटनास्थळी वाहतूक पोलीस, तसेच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पोहचले असून रस्त्यावरील तेल काढण्याच काम वेगाने सुरू आहे. तरी या रस्त्यावरुन जाताना काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.आज घडलेल्या या अपघातात कोणतीही जीवितहानी सुदैवाने झाले आहे आणि टँकर चालकही बचावला आहे.नवले पुलावर सातत्याने अपघात वाढत आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने नवले पूल परिसरात घडणाऱ्या वारंवार अपघाताच्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, अपघातांचे सत्र अद्यापही थांबत नाही.
अगली पोस्ट