पुणे – अमरावती उन्हाळी सुट्टी विशेष ट्रेन
उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेमध्ये अतिरिक्त गर्दी वाढू शकते यामुळे वेगवेगळ्या मार्गावर काही विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये पुण्याहून अमरावतीला जाण्यासाठी एका स्पेशल ट्रेनची सुरुवात होणार आहे.
17 एप्रिल 2023 पासून पुणे ते अमरावती दरम्यान ही साप्ताहिक गाडी सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ०१४५२ क्रमांकाची विशेष एक्स्प्रेस पुण्याहून येत्या १७ एप्रिलला म्हणजे सोमवारपासून धावणार आहे. तर ०१४५१ क्रमांकाचीअमरावती-पुणे
विशेष एक्स्प्रेस १८ एप्रिलपासून म्हणजे मंगळवारपासून धावणार आहे.
पडक्या घराची भिंत कोसळून दोन मजुरांचा जागीच मृत्यू.राजगुरुनगर आझाद चौकातील दुर्दैवी घटना.
मात्र ह्या गाड्या कायम स्वरूपी सुरू राहणार नसून एका विशिष्ट कालावधीसाठीच सुरू केली जात आहे. उन्हाळी सुट्ट्या असेपर्यंत म्हणजेच 27 जून 2023 पर्यंत सुरू राहील अशी माहिती देण्यात आली आहे.
वेळापत्रक व गाडीचे थांबे: या साप्ताहिक रेल्वेगाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर या रेल्वे स्थानकावर थांबे दिले जाणार असल्याचे रेल्वे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी दर सोमवारी पुणे येथून सायंकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी निघेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी 11 वाजता अमरावतीला पोहचणार आहे. तसेच या गाडीच्या अमरावतीहून पुण्याकडील प्रवासाबाबत सांगायचे झाल्यास ही गाडी दर मंगळवारी अमरावतीहून सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी निघेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी साडेसहा वाजता पुण्यात पोहोचणार आहे.