श्री गणेशाय नमः
मंगळवार 18 एप्रिल 2023
शालिवाहन शके 1945 ऐन्द्र योग वाणिज करण
आज चंद्र मीन राशीत असणार आहे उत्तरा
भाद्रपदा नक्षत्र राहील
दिन विशेष शिवरात्री
चैत्र कृष्ण त्रयोदशी
रवी बुध राहू मेष राशीत केतु तूळ राशीत
शुक्र वृषभ व मंगल मिथुन राशीत या सर्व ग्रहांचा विचार करून प्रत्येक राशीचे आजचे भविष्य जाणून घेऊ या
मेष रास
आज चंद्र प्रतिकूल आहे वादविवादाचे प्रसंग येतील आपण शांत असावे नवीन वाहन दुपारी दोनच्या अगोदर घ्या गृहसौख्य उत्तम राहील
वृषभ रास
दोन दिवसापासून आपण टाळत आला आज ते काम पूर्ण होईल अचानक धनलाभाचे योग बाहेर फिरावयास जाल दिवस मजेत जाईल
मिथुन रास
आज काम भरपूर असेल कोणत्या कामाला किती प्राधान्य द्यायचे हे आपण अचूक ठरवाल संध्याकाळ मजेत घालवाल उत्तर दिशा फायदेशीर राहील
कर्क रास
आज तुमच्यासाठी खास दिवस आहे सर्व मनासारखे होत जाईल
जोडीदाराकडून आपले कौतुक होईल मुलांशी फोनवर मनसोक्त बोलणे होईल पित्ताचा त्रास जाणवेल
सिंह रास
आपल्याला चंद्र अनुकूल नाही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा
आर्थिक प्राप्ती उत्तम राहील वाहने सावकाश चालवा.
मारुती सुझुकीची बेस्ट सेलिंग कार ब्रेझा.
कन्या रास
आज चंद्र अनुकूल आहे तरूणांना प्रेमात यश मिळेल विवाह जमतील जोडीदाराची साथ उत्तम लाभेल व्ययसाय जोडीदारापासून सावध राहा.
तुळ रास
जेवणात गोड पदार्थ असणार छोटा प्रवास करावा लागेल शत्रू कुरघोड्या करतील पण तुमच्या हुशारीने त्यांचा काही फायदा होणार नाही धार्मिक स्थळाला जावे वाटेल पण ते रहित होईल
वृश्चिक रास
यशस्वी दिवस राहील दुपारपर्यंत कणकण जाणवेल दिवस करमणुकीत घालवाल
मुलांची प्रगती बघून खूष असाल शॉप्पिंगचा बेत रद्द कराल
धनु रास
घरी राहाल कामाचा कंटाळा येईल घरच्या सोबत आनंदात दिवस जाईल मुलांसाठी विशेष खरेदी कराल
मकर रास
मैदानी खेळात भाग घेणार तुमच्या हातून आज साहित्य लेखन होईल भावंडांशी वादविवाद होतील व त्यामुळे प्रेम अजून वाढेल
कुंभ रास
खर्च तोलूनमापून करणार योग्य तेवढेच बोलणार घरी पाहुणे येतील दुपारी 2 ते 4 मानसिक त्रास राहील
सायंकाळ उत्तम राहील
मीन रास
आज तुमचाच दिवस आहे सर्व तुमच्यावर खूष असणार कामे चुटकीसरशी पूर्ण करणार व आज संध्याकाळी आराम करणार प्रोग्रॅमला जाणे रहित करणार
श्री शरद कुलकर्णी
ज्योतिष अलंकार पुणे
9689743507