किवळे येथे होर्डिंग्ज कोसळून ५ जणांचा मृत्यू,
गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी.
काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बंगळूर मुंबई महामार्गावर किवळे येथे अनधिकृत होर्डिंग्ज कोसळले,या घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेचे वृत्त समजताच जखमींना पिंपरी वायसीएम रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या निष्पाप नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या होर्डिंगसाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी यांच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला.
रस्ते साफसफाई कामाची निविदा. आर्थिक भुर्दंड मात्र महापालिकेस ?
दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना शासन आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्याकडून २५लाख रुपयांची मागणी करत धरणे आंदोलन करण्यात आले.विविध राजकीय पक्षांच्या नेते याठिकाणी पोहोचले होते.
यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर,विनोद भंडारी,धनाजी येळकर पाटील,गणेश सराटे,दत्ता देवतरासे,मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले सहभागी झाले होते.