महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप!!!
इंग्रजी वृत्तपत्र द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमी नुसार महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.केंद्रीय मंत्री अमित शाह यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिल्लीत भेट घेतल्याचे समजते,त्यामुळे अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा जोरात सुरु आहेत.
आणखी पंधरा दिवस थांबा मग कळेल…
इंग्रजी वृत्तपत्र द न्यू इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिल्यांनतर एकच राजकीय खळबळ उडाली होती. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे ५३ पैकी ४० आमदारांच्या सह्या सुद्धा घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
असे असले तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र अजूनही या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे.आमदारांना बोलावून सह्या घेत असल्या तरी अखेरच्या क्षणी शरद पवार यामध्ये हस्तक्षेप करून पारडं फिरवू शकतात. परंतु अजित पवारांच्या सत्ताबदलाला राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ आमदारही पाठिंबा देत असल्याचा दावाही या इंग्रजी वृत्तपत्रात करण्यात आला आहे.