सिंधी भाषिकांसाठी अनोखी कार्यशाळा
अभिनय आणि नाट्याच्या माध्यमातून सिंधी भाषा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी सेंट्रल पंचायत पिंपरी आणि पिंपरी सिंधी थिएटर अकॅडमी यांच्या वतीने एका अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक १४ ते १६ एप्रिल या कालावधीत झालेल्या या अभिनव कार्यशाळेत सिंधी भाषा सहज अवगत होण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये सत्तावीस महिला व पुरुषांचा सहभाग होता.
या कार्यशाळेसाठी अहमदाबादचे हरेश किकवानी व मिस हनी यांनी प्रशिक्षण दिले. ही कार्यशाळा सकाळी दहा ते सहा अशी तीन दिवस घेण्यात आली.
या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून विनिता बसंतानी, ज्योती मसंद सुनील सुखवानी उपस्थित होते.
सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष शिवानंद पमनानी, श्रीचंद नागरानी, इंदोर बजाज मनोहर जेठवाणी, भगवान खतरी, नारायण नाथांनी,दिलीप बसंतानी,प्रकाश मसांद, किकवानी मस हनी,हरेश किकवानी, यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले. शिबिर संयोजनात नारायण नाथानी यांनी विशेष परिश्रम घेतले.