जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी ग्रामपंचायतीला विशेष पंचायत पुरस्कार
राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव..
सर्व समावेशक विकास करणाऱ्या राज्यातील ५ ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.काल दिल्लीच्या विज्ञान भवनात
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज विभागाच्या वतीने दिनांक 17 ते 23 एप्रिल राष्ट्रीय पंचायत सप्ताह साजरा करण्यात येतो. या अंतर्गत राष्ट्रीय पंचायत पुरस्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय ग्रामीण मंत्री फग्गन सिंह कुलस्ते, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, विभागाचे सचिव सचिन कुमार आदी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील टिकेकर वाडी ग्रामपंचायतीने सोलर पॅनल पवनचक्की आणि बायोगॅस च्या माध्यमातून १५हजार वॅट वीज निर्मिती केली त्यांच्या या उल्लेखनीय कामाबद्दल या ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांकाने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार ग्रामपंचायतचे पंच संतोष टिकेकर विकास अधिकारी शरदचंद्र माळी आणि ग्रामसेवक असलम हुसेन शेख यांनी स्वीकारला.
छत्रपती संभाजीनगर मधील पाटोदा ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल प्रकल्प यासाठीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार तर कोल्हापूर जिल्ह्यातील आलाबाद पंचायतीला महिला अनुकूल पंचायत या श्रेणीतील तृतीया क्रमांकाच्या पुरस्काराने केंद्रीय राजमंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
ग्रामपंचायतच्या कामांची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली याबद्दल गावकऱ्यांना विशेष अभिमान व आनंद झाला