मिलिंद डान्स अकादमी तर्फे बहारदार कथक नृत्य संध्या.
पिंपरी,आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दि.१६ एप्रिल रोजी बहारदार
कथक नृत्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. मिलिंद डान्स अकादमी संस्थेचे संचालक श्री मिलिंद रणपिसे व अनिकेत ओव्हाळ यांच्या त्रिदेवता नामस्तवनाने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली. यानंतर श्री मिलिंद रणपिसे व शिष्य स्मितीन भोसले यांनी १२ मात्रांचा ताल चौताल सादर केला यामध्ये पारंपारिक बनारस घराण्याच्या बंदिशी त्यांनी सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर नृत्यालयातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनींचे ‘खेळ मांडीयेला वाळवंटी घाई’ या तुकाराम महारांजाच्या अभंगावर कथक नृत्य सादर झाले. यात रिदधी केंजळे, काव्या वासू , समन्वी बिरादार, शताक्षी कवडे ,शरयू भोर , काव्या असलकर, रिश्या औटी, आव्या गुप्ता, अन्या चौधरी , यश्वी अग्रवाल या कलाकारांनी सहभाग घेतला. त्यानंतर नृत्यालयातील तृतीय वर्षाच्या विदयार्थीनी सौ.वर्षा जाडकर, समीरा मोरे, मोनाली वासू , मानसी पाटील, प्रिती तराळे यांनी राग काफी मधील बंदिश ‘आज खेलो शाम संग होरी’ या पारंपारिक कथक नृत्याने रसिकांची दाद मिळवली. तसेच चतुर्थ वर्षातील विदयार्थीनी कु.अन्वी तराळे, आर्या असलकर व मैथिली शेगूनशी यांनी गगन सदन तेजोमय या प्रार्थनेवरील अप्रतिम नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांना मोहून टाकले. यानंतर सूफिया शेख, मुक्ता देशपांडे, ऋतुजा इंदूरीकर ,नंदिनी दिघे, सृष्टी नाईक, भैरवी सरोदे यांनी राग मल्हार मध्ये त्रिवट सादर केला.
जुन्नर तालुक्यातील टिकेकरवाडी ग्रामपंचायतीला विशेष पंचायत पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव..
कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे कलाकार अनिकेत ओहाळ व ईशीता पाटील यांनी लखनौ घराण्याचा पारंपरिक तीनताल सादर केला व पारंपरिक बंदिश सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
नृत्यातील द्वितीय वर्षांचे विद्यार्थी संगीता रणपिसे, वर्षा बंडे,रुची गुप्ता,बिन्दु नाईक,प्रहर्षिता नाईक,
संध्या शर्मा, सोनाली शर्मा यानी राग मल्हार मधील संत तुलसीदास यांची रचना सादर केली. उत्तरोत्तर रंगलेल्या कार्यक्रमाच्या शेवटी स्मितीन भोसले यांनी कुचीपुडी या शास्त्रीय शैलीचे दर्शन घडविणारा तिल्लाना सादर केला त्याला रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाची सांगता अनिकेत ओव्हाळ व इशिता पाटील यांनी पंडित बिरजू महाराज यांची रचना असलेल्या दरबारी रागातील तराणा सादरीकरणाने झाली.
कार्यक्रमाचे सुरेख निवेदन मानस साठे यांनी केले. तसेच साथ संगत करणारे कलाकार होते ,तबला -यश त्रिशरण, हार्मोनियम व गायन हरिभाऊ असतकर, पाखवाज – पवन झोडगे, पढान्त – अश्विनी जोशी, सिमरन भिसे.