पुण्यात दहशतवादी संघटना PFI ने पाय पसरले
पुणे: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी घातलेल्या संघटनेने कोंढव्यातील ब्ल्यू बेल्स शाळेचे दोन मजले देशविरोधी कृत्यासाठी वापरल्याचा ठपका राष्ट्रीय तपास यंत्रणेने(एनआयए)
ठेवला आहे. त्यानंतर शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत ही शाळा अनधिकृत असल्याचे उघड झाले असून, आता या शाळेवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
मिलिंद डान्स अकादमी तर्फे बहारदार कथक नृत्य संध्या.
विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे म्हणाले, की संबंधित शाळा स्वयं अर्थसहायित आहे. या शाळेच्या कागदपत्रांची तपासणी केली असताना पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून देण्यात आलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.तर शासना कडून देण्यात आलेल्या मान्यता प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. या संदर्भात शिक्षणाधिकारी आणि पुणे महापालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकाऱ्यांकडून सखोल तपासणी करण्यात येत आहे. या पडताळणीचा अहवाल सादर झाल्या नंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल व शाळेवर गुन्हा दाखल करण्यात येईल.